December 1, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीयखेळजिल्हाठळक बातम्यापरिसरफोटोराजकीयराज्यराष्ट्रीयव्हिडिओ

मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यात ‘मोदी माफी मागो’ आंदोलन : नाना पटोले

Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधला याचे पडसाद आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन पुकारलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देत सांगितले की, ”उद्यापासून राज्यात ‘मोदी माफी मागो आंदोलन पुकारण्यात येणार आहे.” 

उद्यापासून ‘मोदी माफी मागो’ आंदोलननाना पटोले यांनी सांगितले की, ”उद्या सर्व भाजप कार्यालयांसमोर आम्ही महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाचा निषेध करणार आहोत. हातात फलक घेऊन ‘मोदी माफी मागो’ अशी मागणी करणार आंदोलन करण्यात येईल. कोरोना काळात महाराष्ट्रानं काय काम केलं हे विचारायचं असेल तर नरेंद्र मोदींनीच उत्तर दिलंय. अंगावर याल तर शिंगावर घेऊ असं म्हणतायेत आम्ही हिसेचं समर्थन करत नाही. पण तुम्ही पंतप्रधानांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचं समर्थन करणार असाल तर  तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात.”

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha

Related posts

युक्रेन-रशिया संकट: युक्रेनच्या अध्यक्षांनी पुतिन यांना जोरदार तणावाच्या दरम्यान चर्चेचा प्रस्ताव दिला

yugarambh

महर्षि प्रशालेचा बास्केटबॉल संघ जिल्ह्य़ात प्रथम ; विभागीय स्पर्धेसाठी निवड

yugarambh

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांचेकडून दुर्गसंवर्धन व दुर्गदर्शन मोहीमेचे आयोजन…

yugarambh

भिमा नदीच्या चढावरून ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर चढवण्यासाठी कारखानदारांनी सुविधा उपलब्ध करून द्यावी.

yugarambh

मराठी साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध कवी आणि लेखक नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धो. महानोर यांचं निधन

yugarambh

काही मिनिटे नाही, तुमचे खाते काही सेकंदात रिकामे होत आहे, ही मोठी चूक करू नका…

yugarambh

Leave a Comment