December 1, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीयखेळजिल्हाठळक बातम्यापरिसरफोटोराजकीयराज्यराष्ट्रीयव्हिडिओ

PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी मानले शरद पवारांचे आभार, म्हणाले…

PM Modi praises Sharad Pawar in Rajya Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. कोणाकडून नाही तर किमान शरद पवार यांच्याकडून तरी शिका असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या खासदारांना लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी लोकसभेत विरोधकांवर हल्लाबोल केला होता. आजही, राज्यसभेत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाकाळातील घटनाक्रमांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, कोरोना काळात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी काहीजणांकडून या बैठकीवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही पक्षांनी बैठकीला हजर राहू नये असे प्रयत्न करण्यात आले. स्वत: देखील उपस्थित राहिले नाही. मी शरद पवार यांचे पुन्हा आभार मानत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित न राहण्याचा निर्णय युपीएचा नसल्याचे सांगत त्यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी इतरांना सांगितले आणि स्वत: देखील उपस्थित राहिले. शरद पवार यांनी या बैठकीत बहुमूल्य सूचना दिल्या असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

कोरोना मानवी समुदायासाठी धोकादायक

कोरोना काळात गरिबांच्या सशक्तिकरणासाठी सरकारने प्रयत्न केले. 100 टक्के लसीकरणाच्या उद्दिष्टाकडे आपण वाटचाल करत आहोत. कोरोना काळात 80 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना मोफत रेशन देण्यात आले आहे. 

रोजगार वाढले 

पीएम मोदी यांनी म्हटले की, कोरोना आधीच्या स्थितीची तुलना करता लॉकडाऊन उठवल्यानंतर नोकरभरतीत दोन पट वाढ झाली आहे. नॅसकॉमच्या अहवालातही हाच कल दिसून आला आहे. अलिकडच्या वर्षांत IT क्षेत्रात 27 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Related posts

OBC Reservation : राज्यात ओबीसींचे प्रमाण 38 टक्के; ‘या’ तीन जिल्ह्यात शून्य टक्के प्रमाण

Admin

यशवंतनगर प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न

yugarambh

ताहेरा फाउंडेशन ने केला दस्तारबंदी झालेल्यांचा गौरव

yugarambh

दसऱ्याच्या ‘युगारंभीय’ शुभेच्छा..!

yugarambh

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असावे – गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख साहेब 

yugarambh

माळीनगर येथे किर्तीध्वज मोहिते- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात .

yugarambh

Leave a Comment