December 1, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीयखेळजिल्हाठळक बातम्यापरिसरफोटोराजकीयराज्यराष्ट्रीयव्हिडिओ

PM Modi in Rajyasabha : PM मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर निशाणा, भाषणातील प्रमुख मुद्दे…

PM Modi Speech Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतीवरील अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सरकारच्या यशस्वी योजना आणि वाटचालींबद्दल सभागृहाला माहिती दिली. जोपर्यंत देशात कोरोना महासाथीचा आजार राहणार तोपर्यंत सरकार गरिबातील गरीब कुटुंबासाठी आयुष्य वाचवण्यासाठी जेवढा खर्च येईल, तेवढा खर्च सरकार करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. 

नेहरूंवरही टीका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. गोव्याच्या स्वातंत्र्याच्या 60 वर्षांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरदार पटेल यांनी ज्या प्रकारे हैदराबाद, जुनागडसाठी धोरण आखले होते, त्याचप्रमाणे त्यांनी गोव्यासाठी धोरण आखले असते तर त्यांना 15 वर्षांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली नसती. त्यावेळी भारताच्या पंतप्रधानांना आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची काळजी होती. गोव्यात नागरीक गोळीबारात मृत्यूमुखी पडत असताना नेहरूंनी गोव्यात लष्कर पाठवण्यास नकार दिला होता, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचण्याचा सल्ला 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघराज्य पद्धतीबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचण्याचा सल्ला विरोधकांना दिला. पंतप्रधान मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणातील एक संदर्भ वाचून दाखवला. फेडरेशन एक युनियन आहे. प्रशासनाच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती होऊ शकते. मात्र, देश अभिन्न आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. 

रोजगार वाढले 

पीएम मोदी यांनी म्हटले की, कोरोना आधीच्या स्थितीची तुलना करता लॉकडाऊन उठवल्यानंतर नोकरभरतीत दोन पट वाढ झाली आहे. नॅसकॉमच्या अहवालातही हाच कल दिसून आला आहे. अलिकडच्या वर्षांत IT क्षेत्रात 27 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

महागाईवर नियंत्रण

महागाईला रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 2014 ते 2020 या दरम्यानच्या काळात महागाईचा दर 4 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान होता. युपीएच्या काळाशी तुलना केली तर लक्षात येईल महागाई काय असते. आज देशाची अर्थव्यवस्था मोठी अर्थव्यवस्था होत असून विकासासोबत मध्यम महागाईचा सामना करत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला आहे अथवा महागाईचा उच्चांक गाठत आहे. 

एमएसएमई आणि कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष 

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, एमएसएमआय आणि कृषी क्षेत्रात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी सरकारने प्रयत्न केले. शेतकऱ्यांना अधिक एमएसपी मिळाला. पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले.  संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात पैसे होते. MSME सेक्टरच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला अधिक निधी मिळाला. भारत आता सर्वाधिक मोबाइल उत्पादन करणारा देश ठरला आहे. ऑटोमोबाइल आणि बॅटरी उत्पादन क्षेत्रात चांगले सकारात्मक वातावरण आहे. 

कोरोना मानवी समुदायासाठी धोकादायक

कोरोना काळात गरिबांच्या सशक्तिकरणासाठी सरकारने प्रयत्न केले. 100 टक्के लसीकरणाच्या उद्दिष्टाकडे आपण वाटचाल करत आहोत. कोरोना काळात 80 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना मोफत रेशन देण्यात आले आहे. 

गरिबांना लखपती केले

अनेक अडथळे असूनही लाखो गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. घरं मिळाल्याने गरीब आता लखपती झाले असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

Related posts

yugarambh

अकलूज गृहविज्ञान महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

yugarambh

काँग्रेस नसती तर… ; राज्यसभेतील भाषणात पंतप्रधानांचा हल्लाबोल

Admin

नॅक कमिटीची अकलूजच्या गृहविज्ञान महिला महाविद्यालयास भेट.

yugarambh

जि.प.शाळा रावबहाद्दूर गट, बिजवडी येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात 

yugarambh

आमिष दाखवले लग्नाचे, केला अत्याचार ;माळीनगरच्या आरोपीला मिळाला पोलिसांचा पाहुणचार

yugarambh

Leave a Comment