December 8, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीयखेळजिल्हाठळक बातम्यापरिसरफोटोराजकीयराज्यराष्ट्रीयव्हिडिओ

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार मोफत वीज

UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीला 10 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत ‘लोक कल्याण ठराव पत्र’  या शिर्षकाखाली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

भाजपच्या जाहीरनाम्यात, सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. याबरोबरच पाच हजार कोटींची कृषी सिंचन योजना सुरू होणार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 14 दिवसांत पैसे दिले जाणार, विलंब झाल्यास त्या रक्कमेवर व्याज दिले जाईल, राज्यातील प्रत्येक विधवा आणि निराधार महिलेला दर महिन्याला 1 हजार 500 रुपये पेन्शन मिळेल, सहा मेगा फूड पार्क उभारण्यात येणार आहेत तर पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीसह सरदार पटेल कृषी-पायाभूत सुविधा अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. 

जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘भाजप येत्या 5 वर्षांत लोकांचे जीवन बदलण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. पाच वर्षापूर्वीही भाजपने याच सभागृहात आपला जाहीरनामा सादर केला होता. उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य असून राज्यातील प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे. 2017 च्या आधी राज्यात 700 दंगली झाल्या होत्या. उत्तर प्रदेशात आज संचार बंदी लागत नाही तर कावड यात्रा निघते. राज्यभरात सण-उत्सव आनंदात साजरे होत आहेत. 86 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. पाच लाख तरूणांना रोजगार मिळाला आहे. “

 उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सांयकाळी संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27  फेब्रुवारीसह 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

उत्तर प्रदेश हे देशातील मोठे आणि महत्वपूर्ण राज्य आहे. उत्तर प्रदेशच्या निकालावरच देशभरातील राजकारणाची पुढील दिशा ठरत असते. त्यामुळे सर्वच पक्ष या राज्यात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ की अखिलेश यादव?  

उत्तर प्रदेशची सत्ता योगी आदित्यनाथ यांच्याकडे जाणार की अखिलेश यादव यांच्याकडे जाणार हे येत्या महिन्याभरात स्पष्ट होणार आहे. असं असलं तरी उत्तर प्रदेशच्या एबीपी न्यूजच्या सी वोटर सर्व्हेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं दिसतंय. तर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर अखिलेश यादव यांच्या नावाला पसंती दिली आहे. 

एबीपी न्यूजने केलेल्या सी व्होटर सर्व्हेमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नावाला सर्वाधिक म्हणजे 43.6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर अखिलेश यादव यांच्या नावाला 33.7 टक्के लोकांना पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर बसपच्या मायावती असून त्यांच्या नावाला 15.6 टक्के लोकांना पसंती दिली आहे. प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ 4.4 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 

महत्वाच्या बातम्या

UP Election: योगी आदित्यनाथ की अखिलेश यादव? उत्तर प्रदेशच्या सत्तेचा मुकुट कुणाच्या डोक्यावर? जाणून घ्या जनता कौल काय…
UP Election: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी राज? भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये चुरशीची लढत

Related posts

yugarambh

माळीनगर -लवंगची ‘शाही ‘ ग्रामपंचायत निवडणूक

yugarambh

रविवार विशेष लेख .. ‘लालपरीचं अप्रूप’.-प्रा. गणेश करडे

yugarambh

प्रा. पापामिया खतीब यांच्या मुलीचा शाही विवाह समारंभ

yugarambh

माळीनगर येथे विविध ठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती साजरी

yugarambh

हर घर तिरंगा अभियान घरोघरी पोहोचवा….  – डीवायएसपी बसवराव शिवपुजे

yugarambh

Leave a Comment