December 1, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीयखेळजिल्हाठळक बातम्यापरिसरफोटोराजकीयराज्यराष्ट्रीयव्हिडिओ

Womens IPL : पुढच्या वर्षी येणार महिला आयपीएल? बीसीसीआय सचिवांचं मोठं वक्तव्य

Womens IPL 2023 : भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय लवकरच महिला आयपीएल (Womens IPL) सुरू करण्याचा विचार करत आहे. महिला आयपीएल (IPL) 2023 मध्ये सुरू होऊ शकते. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे. पुरुषांच्या आयपीएलसोबतच महिलांसाठी तीन संघांची टी 20 लीग खेळवली जाणार आहे, परंतु पुरुषांप्रमाणेच महिलांसाठी स्वतंत्र आयपीएल सुरू व्हायला हवे, असे अनेकांचे मत आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे की, ”महिला संघाचे टी 20 चॅलेंज यावर्षी सुरू राहणार आहे. लवकरच परिस्थिती बदलेल. मी तुम्हाला खात्री देतो की बीसीसीआय लवकरच आयपीएल सारखी महिला लीग सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे.” शाह यांनी सांगितले आहे. महिला टी20 चॅलेंजबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह आहे”

यंदा भारतात होणार आयपीएलचे आयोजनभारतात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने आयपीएल 2020 चा संपूर्ण हंगाम आणि आयपीएल 2021 चा अर्धा सीझन संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावर्षी आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. जय शाह यांना विश्वास आहे की यंदाची आयपीएल भारतात आयोजित केली जाईल. आयपीएल सामन्यांमध्ये प्रेक्षकांना परवानगी कोविड मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha

Related posts

पंचायत समिती इंदापूर येथे महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेत विविध उपक्रमांनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

yugarambh

रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक शाळा, नातेपुते या प्रशालेची मासिक सभा संपन्न

yugarambh

‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर सुरु केलेल्या रत्नाई मिठाईचा नागरिकांनी आस्वाद घ्यावा- मा. जयसिंह मोहिते पाटील

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूज येथे दिंडी पालखी सोहळा संपन्न

yugarambh

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकलूज शहर युवक कार्याध्यक्षपदी शहाजी खडतरे तर महिला आघाडी शहराध्यक्षपदी जयश्री गायकवाड यांची निवड

yugarambh

Leave a Comment