December 2, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीयखेळजिल्हाठळक बातम्यापरिसरफोटोराजकीयराज्यराष्ट्रीयव्हिडिओ

पंतप्रधान मोदी यांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात संताप; सोशल मीडियावर पडसाद

PM Modi on Coronavirus Spreading : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. या भाषणादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले. देशभरात कोरोना पसरवण्यासाठी काँग्रेसने परप्रांतीय मजुरांना मोफत रेल्वे तिकिट काढून उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाठवले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली असली तरी त्यांचे वक्तव्य महाराष्ट्र आणि परप्रांतीय कष्टकरी वर्गाचा अपमान करणारे असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते पंतप्रधान 

कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेसने केले. काँग्रेसनं यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. लॉकडाउनमध्ये मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे काढून दिली. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. 

ट्वीटरवर भाजपविरोधात ट्रेंड 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले. ट्वीटरवर #महाराष्ट्रद्रोही_bjp हा ट्रेंड सुरू झाला होता. अनेक नेटकऱ्यांनी पंतप्रधानांचे वक्तव्य संवेदनाहीन असल्याचे म्हटले. अचानकपणे लॉकडाउन लावून कष्टकरी, गरीब मजूरांना वाऱ्यावर का सोडले, असा प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केला. 

Who is responsible for this?? @narendramodi #महाराष्ट्रद्रोही_bjp pic.twitter.com/oBkMeuEVio


— Bharat Sawade🇮🇳 (@bharat_sawade) February 7, 2022

He has not only attacked Maharashtra but also accused the tyrannized labourers of spreading covid in North India. Power blinded he forgot that he’s their PM too.#महाराष्ट्रद्रोही_bjp


— Pratik S Patil (@Liberal_India1) February 7, 2022

जगभरात कोरोनाची लाट येत असताना विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यावेळी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते, असाही मुद्दा नेटकऱ्यांनी मांडला.

Visionary Vs Tele’Visionary’ #महाराष्ट्रद्रोही_bjp #ModiLies pic.twitter.com/7hdylVm3K1


— Sourabh Patil (@sourabhRpatil1) February 7, 2022

पायपीट करून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपले गाव गाठणाऱ्या मजुरांचे हाल दिसले नाही, का असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. 

काही युजर्सने भाजप नेत्यांची जुनी भाषणे ट्वीट केलीय. या भाषणांच्या क्लिपमध्ये मजुरांसाठी रेल्वे सोडल्याचे श्रेय भाजप सरकारला देत असल्याचे भाजप नेते दिसत आहेत. 

Mr. Mi Punha Yein claims 525 trains were provided by Central Railways under Mr. Goyal & 7 lakhs migrants travelled to their villages. But PM says Congress forced migrants to travel from Mumbai? Who is lying ?#CryBabyModi #महाराष्ट्रद्रोही_bjp pic.twitter.com/VTWtitshRn


— Priyamwada🦋 (@PriaINC) February 7, 2022

पियुष गोयल संपूर्ण देशात कोरोना पसरवण्यासाठी स्पेशल ट्रेन द्यायला तयार होते आणि वरून श्रमिकांची लिस्टही मागत होते.#महाराष्ट्रद्रोही_bjp https://t.co/SuB39BaLeh


— Rohan (@rohanreplies) February 7, 2022

कोरोना महासाथीचे सावट असताना नमस्ते ट्रम्प आणि निवडणूक प्रचार सभा घेतल्या त्याने कोरोना पसरला नाही का, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. 

Related posts

शिवतिर्थ आखाडा, शंकरनगर- अकलूज येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

yugarambh

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात न्यायालयाचा मोठा निर्णय, 49 जण दोषी तर 28 जण निर्दोष

Admin

लवंग परिसरात बैलपोळा बाजार गजबजला

yugarambh

युवासेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने संभाजीनगर येथील चिमुकल्यास विस हजार रु ची मदत 

yugarambh

सोलापूरमध्ये लग्नावरून परत येताना भीषण अपघात, डॉक्टर दाम्पत्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू

yugarambh

शहीद दिनानिमित्त माळीनगर प्रशालेकडून विनम्र अभिवादन

yugarambh

Leave a Comment