December 1, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीयखेळजिल्हाठळक बातम्यापरिसरफोटोराजकीयराज्यराष्ट्रीयव्हिडिओ

किती महागले गहू, तांदूळ? गेल्या पाच वर्षातील दरवाढीची केंद्राने दिली माहिती

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 22 खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये तांदूळ, गहू आणि मैद्याच्या किमती पाच वर्षांत किती आहेत याची माहिती आहे. आसामचे खासदार एम. अबरुद्दीन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अन्न मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तांदूळ, गहू आणि मैद्याच्या किमती वाढल्या आहेत.

तांदळाची किंमत किती?गेल्या पाच वर्षांत तांदळाचे भाव सातत्याने वाढत आहेत. गेल्या पाच वर्षांत तांदळाच्या दरात सुमारे आठ रुपयांनी वाढ झाली आहे. 2016 मध्ये तांदळाची किंमत (प्रतिकिलो) 27.71 रुपये होती, ती 2021 मध्ये 35.65 रुपये झाली आहे. तांदळाची किंमत 2017 मध्ये (प्रतिकिलो) 29.57 रुपये, 2018 मध्ये 30.09 रुपये, 2019 मध्ये 32.09 रुपये आणि 2020 मध्ये 35.26 रुपये होती.

पाच वर्षांत गहू महागलागेल्या पाच वर्षांत गव्हाचे भावही वाढले आहेत. 2016 मध्ये गव्हाची किंमत (प्रतिकिलो) 23.80 रुपये होती जी 2021 मध्ये वाढून 26.98 रुपये झाली. गव्हाचे दर दरवर्षी सरासरी 1 रुपयांनी वाढले आहेत. गव्हाची किंमत 2017 मध्ये 23.75 रुपये, 2018 मध्ये 24.74 रुपये, 2019 मध्ये 27.50 रुपये आणि 2020 मध्ये 28.22 रुपये होती.

मैद्याचे दरही वाढलेगहू आणि तांदूळ व्यतिरिक्त मैद्याच्या दरातही वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी मैद्याचा भाव 25.64 (प्रतिकिलो)रुपये होता जो 2021 मध्ये 30.50 रुपये झाला. मैद्याची किंमत 2017 मध्ये (प्रतिकिलो) 26.08 रुपये, 2018 मध्ये 26.80 रुपये, 2019 मध्ये 28.95 रुपये आणि 2020 मध्ये सर्वाधिक 31.17 रुपये होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha

Related posts

तुका म्हणे त्यांचे केले आम्हां वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत:- ह.भ.प.अभिजित महाराज कुरळे

yugarambh

श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय मध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

yugarambh

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – डॉ. नितीन राऊत

yugarambh

शिक्षण संचालनालयाकडून योजनांचा ‘जागर’!…..कालबद्ध नियोजनातून राज्यभर अंमलबजावणी

yugarambh

सहकार महर्षि कै.शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांना संग्रामनगर येथे अभिवादन

yugarambh

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित आट्यापाट्या स्पर्धेचे बक्षीस वितरण. पुढील वर्षी दुप्पट बक्षीस -मा. जयसिंह मोहिते -पाटील

yugarambh

Leave a Comment