अकलूज- सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज ,प्रशालेत आज दि.१९/०२/२०२२ रोजी🚩”हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज”🚩 यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रशालेतील इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय,राजमाता जिजाऊ,तानाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे,मुरारबाजी, राणीसाहेबा,गडावरील सेविका व स्वराज्याचे शुर मावळे यांच्या भूमिका साकारल्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज सर्व सेनापती यांचे घोड्यावरून जल्लोषात आगमन झाले.त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.आणि मंचावर साकारलेल्या दरबारात आसनस्थ झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कृष्णा लावंड, प्रमुख अतिथी सौ.जगदाळे मॅडम आणि मुख्याध्यापिका शेख मॅडम यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
प्रशालेतील विद्यार्थिनी कु. अक्षरा कदम हीने १० मिनिटांचा पोवाडा गायला.तसेच कू.सिनिम शेख,आयुष कोरेकर,उत्कर्ष लवटे,शंभूराजे देशमुख,मृणाल शहाणे आणि मानसी एकतपुरे या विद्यार्थ्यांनी आपल्या कणखर आवाजात शिवरायांच्या कार्याचा इतिहास आपल्या भाषणातून मांडला.
शेवटी प्रमुख अतिथी सौ.जगदाळे मॅडम यांनी महाराजांचे प्रशासन व युद्धनीती या बाबींचा आढावा आपल्या व्याख्यानातून मांडला.
कार्यक्रमाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक – शिक्षकेतर वृंद,विद्यार्थी व आपल्या मुलांच्या अंगी असलेले कलागुण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी सर यांनी केले.