मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची दिल्लीतील परिवहन भवन येथे आज मा. सुभाष देसाई यांनी भेट घेतली.
बैठकी दरम्यान मराठी भाषा व अभिजात दर्जा देणे याविषयासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा झाली.
येत्या मराठी भाषा गौरव दिनापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी आशा आहे असे मत मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.