🚩 *मराठी भाषा गौरव दिन….
*सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज प्रशालेत आज दि.२७/०२/२०२२ रोजी🚩”मराठी भाषा गौरव दिन🚩* साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात प्रशालेच्या कार्यालयातील सरस्वती मातेच्या मूर्तीपूजनाने करण्यात आली.
यावेळी प्रशालेतील १ ली इयत्तेकडून ज्ञानेश्वरी, भगवद् गीता यासारख्या महान ग्रंथांचे पूजन व मराठी साहित्यातील वैविध्यपूर्ण 📚 ग्रंथ,कादंबऱ्या इ. चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी ते प्रदर्शन व विविध साहित्य यांची माहिती जाणून घेतली.
त्याचबरोबर प्रशालेच्या प्रांगणात मराठी पुस्तकांचे सामूहिकपणे वाचन करत 🚩”माय मराठी” 🚩ही अक्षरे साकारली व मराठी भाषेला प्रशालेकडून मानवंदना🙏 देण्यात आली.*
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम यांनी मुलांना मराठी भाषेचे महत्व आणि महात्म्य यांचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक-शिक्षिका,सेवक,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले.कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.