महर्षी प्रशाला,प्राथमिक विभाग यशवंतनगर येथे *मराठी भाषा गौरव दिन व वि. दा.सावरकर पुण्यतिथी* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली
विद्यार्थ्यांना विविध लेखक व त्यांची पुस्तके यांची ओळख व्हावी यासाठी या दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महर्षि प्रशालेचे सहशिक्षक श्री.गुरव सर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री इनामदार काका यांची उपस्थिती लाभली तसेच पालकांचा प्रदर्शनासाठी उत्तम प्रतिसाद लाभला
.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा व सावरकर यांच्या विषयी आपले मत मांडले.
विविध पुस्तके पाहताना मुले हरखून गेली होती व पुस्तक प्रदर्शनाचा आनंद घेत होती
सदर कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे व ग्रंथालय विभाग प्रमुख साळुंखे सर तसेच प्रशालेतील इतर सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.