प्रतिनिधी-
बाभूळगाव येथील विजयसिंह मोहिते विकास सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक मा.सभापती रावसाहेब पराडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झालेली असता या संस्थेच्या चेअरमन पदी भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पराडे पाटील यांची व व्हा चेअरमन पदी दगडू पराडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री पी.एन.सुळ साहेब व सहा. अधिकारी श्री.राऊत साहेब यांनी कामकाज पाहिले.माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील, मा. श्री.जयसिंह मोहिते पाटील,मा.आ.श्री.रणजितसिंह मोहिते पाटील, मा.आ.श्री.राम सातपुते, मा.श्री.धैर्यशील मोहिते पाटील,रावसाहेब पराडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालत आले आहे.
तसेच संस्थेच्या स्थापनेपासून गेल्या 20 वर्षा पासून संस्था बिनविरोध व पहिल्या वर्षेपासून लाभांश वाटप करणारी एकमेव संस्था आहे.संस्थेचे एकूण ५० लाख रुपये वाटप आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीककर्ज वाटप करण्यात प्रयत्न करण्यात येईल असे निवड जाहीर होताच नूतन चेअरमन बाळासाहेब पराडे पाटील यांनी सांगितले.