December 8, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

‘सह्याद्री प्रतिष्ठान’ ची मंगळवेढा येथील ऐतिहासीक बारव स्वच्छता मोहीम फत्ते…

अकलूज –सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान -सोलापूर जिल्हा विभागाच्या वतीने रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी मंगळवेढा मधील ऐतिहासीक पुरातन बारव स्वच्छता मोहीम संपन्न फत्ते झाली.

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने मंगळवेढा येथील महादेव मंदिरा लगत असलेली पुरातन बारव ची स्वच्छता सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. मोहिमेची सुरुवात दुर्गसेवकांच्या हस्ते बारवचे पूजन करून करण्यात आली. सदर बारव पुरातन असून बारवमध्ये अनेक लहान मंदिरे आहेत.परंतु ही बारव खूप अस्वच्छ असून काही भागाची पडझड हि झालेली होती.

यासाठी मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.निशिकांत प्रचंडराव साहेब यांची परवानगी घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने मोहिमेचे आयोजन केले होते. बारव मधील माती, प्लास्टिक, काटेरी झाडेझुडपे, पालापाचोळा तसेच इतर कचरा पूर्णपणे काढण्यात आला व बारव कडे जाणारा पायरी मार्ग मोकळा करण्यात आला.

सदर मोहीम सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. आशिष पताळे-पाटील व जिल्हा प्रशासक श्री.अविनाश पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

या मोहिमेस सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा असे विविध तालुका विभागतील 30 पेक्षा जास्त दुर्गसेवक उपस्थित होते.या मोहिमेस नगरपरिषद मंगळवेढा चे मुख्याधिकारी श्री.निशिकांत प्रचंडराव साहेब, नगरपरिषदेचे कर्मचारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. श्री.प्रवीण म्हेत्रे, श्री सुदर्शन यादव व नगरपरिषद मंगळवेढा यांच्यावतीने मोहिमेस अल्पोपहार दिला.

उपस्थित सर्वांचे आभार मानून मोहिमेची सांगता करण्यात आली.

Related posts

अकलूजच्या विद्यार्थिनींनी शाळेमध्ये ७०० आकाशकंदील बनवून नवनिर्मितीचा आनंद लुटला.

yugarambh

श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालयांमध्ये रत्नाई पुरस्कार सोहळा संपन्न

yugarambh

नवा गडी, नवं राज्य… सोलापूरचे पालकमंत्री विखे -पाटील….. इतर पालकमंत्री यादी जाहीर

yugarambh

विधान परिषदेचे आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील* यांच्या *वाढदिवसानिमित्त*व भारताच्या स्वातत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

yugarambh

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार मोफत वीज

Admin

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त महर्षि संकुलात विविध कार्यक्रमांचे आयोजन

yugarambh

Leave a Comment