माळीनगर (प्रतिनिधी)- येथील अजितदादा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,माळीनगर या संस्थेच्या नूतन चेअरमनपदी अरुण निवृत्ती मदने व व्हा. चेअरमनपदी संजय निवृत्ती राऊत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
अजितदादा ग्रा.बिगरशेती सहकारी पतसंस्थेची सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी नुकतीच पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. या संस्थेची ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून संस्थेच्या नूतन संचालकपदी विश्वनाथ चोळे,शिरिष फडे, संजय राऊत,कपिल भोंगळे, विलास इनामके, हेमंत रासकर, सीमा फडे, शमा शिंदे,निलेश गिरमे,अरुण मदने,हरिदास कांबळे हे बिनविरोध निवडून आले होते.
यानंतर संस्थेच्या नूतन चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी आज संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी जी बी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची पहिली सभा घेण्यात आली.यावेळी नूतन चेअरमन पदासाठी अरुण मदने व व्हा.चेअरमन पदासाठी संजय राऊत या दोघांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री जाधव यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी नूतन चेअरमन अरुण मदने व नूतन व्हा. चेअरमन संजय राऊत यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक विश्वनाथ चोळे, शिरीष फडे,विलास इनामके, कपिल भोंगळे,हेमंत रासकर,सीमा फडे,शमा शिंदे,निलेश गिरमे,हरिदास कांबळे,सेक्रेटरी गणेश कुलकर्णी व कॅशिअर विद्या गिरमे आदी उपस्थित होते.