युगारंभ / माळशिरस-अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुका यांच्या वतीने दिनांक 13 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह माळशिरस येथे माळशिरस तालुका नवीन कार्यकारिणी निवड करणे, समाजातील विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे, होलार समाज अधिवेशन आदी विषयांवर महत्वाच्या मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेस अखिल भारतीय होलार समाज संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग गेजगे सर हे उद्घघाटक म्हणून तर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष
नंदकुमार केंगार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय सचिव, हैदर केंगार,दै.सुराज्य पत्रकार गणेश करडे सर,कार्याध्यक्ष दिपक ऐवळे ,दादासाहेब नामदास, लालासाहेब गेजगे, ज्ञानेश्वर गुळीग,पत्रकार सचिन करडे, बाळासाहेब पारसे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याचे तालुका अध्यक्ष हनुमंत बिरलिंगे यांनी सांगितले.
कोरोना पाश्र्वभूमीवर दोन वर्षांपासून सामाजिक कामे ठप्प होते.त्यामुळे सदर मिटिंग तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते समाजबांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष सुनिल ढोबळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल ढोबळे,हनुमंत बिरलिंगे,दिनेश जावीर,बाजीराव केंगार,गणेश केंगार,दत्ता ढोबळे,बापूदादा ढोबळे,दादा करडे,अभिमन्यू काबंळे,संजय हेगडे, आदिनाथ नामदास, आदी कष्ट घेत आहेत.