माळीनगर (गणेश करडे )-8 मार्च जागतिक महिला दिन दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजन करून झाली. प्रतिमापूजन सर्व महिला च्या हस्ते करण्यात आले प्रातिनिधिक स्वरूपात प्रशालेचे उपप्राचार्य प्रकाश चवरे यांच्या हस्ते महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.
नंतर इयत्ता पाचवी मधील सर्व मुलींनी आपल्या शिक्षिका
सविता क्षीरसागर, सुवर्णा पोळ, वैशाली बनकर, सुखदा विधाते, सविता पोटे, सविता नेवसे, सुप्रिया झगडे वैशाली पांढरे, माया शिंदे, उज्वला डांगे, आशा रानमाळ, मनीषा नलवडे, उमा महामुनी, शोभा जोशी, किशोरी चौरे, रजनी चवरे, रूपाली नवले, माधुरी सुरवसे, निशा दळवी, कांताबाई सर्जेराव, अफसाना शेख
यांचा बुके देऊन सन्मान केला.
विद्यार्थिनी सुप्रिया डावरे, प्रतिक्षा मोरे, दिक्षा कुटे, श्रद्धा सावंत यांनी महिला दिनावर भाषणे केली. त्याबद्दल मुलींना वही व गुलाब पुष्प देऊन त्यांचे कौतुक केले. शिक्षक जगन्नाथ कोळी यांनी स्वयम् रचित महिलांविषयी कविता सादर केली त्यांचाही सत्कार करण्यात आला.
८ मार्च स्नेहल वजाळे या विद्यार्थिनीचा वाढदिवस होता, त्याबद्दल तिला गुलाब पुष्प देऊन उपप्राचार्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले तर आभार मधुकर शिंदे यांनी मानले
कार्यक्रमासाठी मारुती आदलिंगे, मधुकर शिंदे,महेश शिंदे आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.