यशवंतनगर -शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग, यशवंतनगर ता. माळशिरस येथे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कोव्हिड काळात कठीण परीस्थितीतही समाजाच्या आरोग्याची काळजी घेत ज्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली,अशा यशवंतनगर ता. माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी इ 3 री. व 4 थी मधील विदयार्थीनींनी विविध पाककृतीचे प्रदर्शन भरविले होते.
तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विविध स्त्रियांचे वेशभूषा सादरीकरण करण्यात आले.
यशवंतनगर प्रा.आ. केंद्रातीलआरोग्य सहाय्यिका सुप्रिया मोरे,आरोग्य सेविका सुषमा कराड, आशा सुर्यगण, आशा स्वयंसेविका बनसोडे, भुसारे, संजीवनी चव्हाण, मंदा पाटोळे,शोभा गवळी, रूपाली दोरकर, स्वरूपा साठे,उमा बिचीतकर, आस्मा मुजावर, आरती आडेकर, शोभा साळुंखे, अंबुताई शिंदे गटप्रवर्तक शब्बाना शेख या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि प्रशालेतील शिक्षिका निलीमा भोंग, संगीता गोडसे, वाघमारे सुषमा,दिपाली देशमुख, वंदना स्वामी,उर्मिला भोसले, प्रमिला कोकाटे, हेमा भाकरे, प्रफुल्लता ढालपे, गनिता सर्वगोड, शुभांगी दिक्षीत, ललिता सावंत, मंगल पारसे, कांता साठे यांचा सन्मान फेटा, गुलाबपुष्प,लेखणी व विद्यार्थ्यांनी बनवलेली भेटकार्ड देऊन करण्यात आला.

यानिमित्त इ.४थी मधील विद्यार्थिनींनी ‘कोरोना ‘ वर आधारित जनजागृती पथनाट्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रिया मोटे यांनी महिलांचे समाजातील असणारे महत्वाचे स्थान सांगत , ज्ञान, प्रगती यांबरोबरच आरोग्य देखील सांभाळून निरोगी राहिले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रम प्रशालेच्या सभापती मा. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून,मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडला.
कार्यक्रमासाठी विदयार्थीनी,महिला पालक, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला भोसले व आभार संगीता गोडसे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोग्य सहाय्यक विलास झुरळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.