माळीनगर (प्रतिनिधी): सोलापूर डिसीसी बँकेचा 104 वा व माळीनगर शाखेचा 35 वा वर्धापनदिन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने बँकेचा ग्राहक खातेदार स्नेहमेळावा पार पडला.

बँकेच्या ठेवी व कर्ज,बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या आरटीजीएस,एनइएफटी,मायक्रो एटीएम, सुविधा ठेव,विमा संरक्षण याबाबत ग्राहकांना माहिती देण्यात आली.माळीनगर शाखेच्या संलग्न विकास सोसायट्यांनी वसुलीसाठी चांगले सहकार्य केल्याबद्दल संस्थाध्यक्ष,संचालक व सचिवांचा बँकेतर्फे सत्कार करण्यात आला.जागतिक महिला दिनानिमित्त येथील मॉडेल विविधांगी प्रशालेतील शिक्षिकांचा बँकेने सन्मानित केले.बँक निरीक्षक एम.एस गायकवाड व शाखा व्यवस्थापक महावीर वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाषदादा निंबाळकर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे,कांतीलाल एकतपुरे,महादेव वाळेकर,दिलीप एकतपुरे,राजेंद्र शिंदे,बाबासाहेब पवार,ग्रामपंचायत सदस्य विराज निंबाळकर,बाळकृष्ण काकडे,अशोक कदम,शहाजी कदम,नेताजी महाडिक पाटील,नागेश जाधव,हणमंत पवार,रंगनाथ भागवत,मुकुंद भागवत,विकास कोळेकर,नंदकुमार पवार,मॉडेल प्रशालेचे उपप्राचार्य प्रकाश चवरे,किशोर कुलकर्णी,गोपाळ कुटे,शुगरकेन सोसायटीचे मॅनेजर अनिल गिरमे,श्रीनिवास गिरमे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून बँकेस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी बँक कर्मचारी मुकुंद वजाळे,एस.एस पराडे,एल.के भोई,डी.के जाधव,उमेश निंबाळकर,प्रशांत धुमाळ,तानाजी मोहिते,शहाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले