December 8, 2023
yugarambh
Breaking News
Otherराज्य

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने ‘परंडा भुईकोट किल्ल्याची ‘ स्वच्छता मोहिम.

अकलूज (प्रतिनिधी )-परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात मागील दोन वर्षापासुन मोठ्याप्रमाणात काटेरी झुडपांचा,झाडांचा वेढा पडुन पर्यटनासाठीचे सर्वच रस्ते बंदआवस्थेत होते.या किल्ल्यात दुर्गप्रेमी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने रविवार ता.६ रोजी वाढलेली काटेरी झाडेझुडपे,पथरस्त्यावरील गाजर गवताने व्यापलेला परिसरात मोठे परिश्रम घेत स्वच्छता मोहिम राबवुन रस्ते मोकळे करीत गडसंवर्धनाचा संदेश दिला.

या मोहिमेत एकुण ६५ दुर्गसेवकांनी सहभाग घेतला होता.यामोहिमेत कांही स्थानिक दुर्गप्रेमी युवक सहभागी होते.

मध्ययुगीन स्यापत्यशास्ञाचा उत्कृष्ट नमुना म्हणुन परंडा भुईकोट किल्ल्याची सर्वदुर मोठी ओळख आहे.आजही या किल्ल्यात मौल्यवान पंचधातु व इतर मोठ्या आकाराच्या लोखंडी तोफा असुन,२६ बुरुजांनी भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्यात अनेक प्राचीन अवशेष पाहण्यास मिळतात. कोरानाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आजमितीस येणाऱ्या पर्यटकांना किल्लाबंदीचा आदेश कायम आहे.हे बंद दरवाजे कधी उघडणार याची प्रतिक्षा इतिहासप्रेमी,पर्यटकांना लागुन आहे.

मागील दोन वर्षापासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुईकोट परंडा किल्ला बंदअवस्थेत पडुन होता.आतील सर्व भागात प्रचंड मोठ्याप्रमाणात काटेरी झाडेझुडपे,मोठमोठ्या शेवरा झाडांनी किल्ला झाकाळुन गेला आहे.आलेल्या एकाही पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी वाट,मार्गच नसल्याने आतील किल्ला भागात कुठेच फिरता येत नव्हते.

एकुण २६ बुरुजावरही गवताने,काटेरी झुडपाने मौल्यवान तोफा बुजुन गेल्या आहेत. मुख्य बुरुज वजा सर्वच बुरुजावर,पथरस्त्यावर प्रचंड दाट काटेरी झाडेझुडपे,मोठमोठे गाजर गवत वाढलेले आहे.पर्यटकांना ही झाडेझुडपे काढल्याशिवाय संपुर्ण किल्ला पाहता येणार नाही अशी दुरावस्था झालेली आहे.

      माञ सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानने राज्य पुरातत्व विभागाची लेखी परवानगी घेऊन ता.२७ फेब्रुवारी व ता.६ मार्च रविवार रोजी सलग दोन वेळेस भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम राबवुन अथक परिश्रमातुन पर्यटकांसाठीचे रस्ते,पथरस्ते चकाचक करुन मोकळे केले आहेत.

एकुण ५ बुरुजावरील तोफेच्या आजुबाजुचा काटेरी झाडांचा,गवताचा विळखा काढुन सुस्थितीत तोफा ठेवल्या आहेत.प्रत्यक्षदर्शी पाहिले असता अतिशय कठिण ठिकाणी जात जीवाची पर्वा न करता काटेरी झुडपे हटविली आहेत.या स्वच्छता मोहिमेत छञपती शिवाजी महाराज ,हर हर महादेव नामाचा गजर करीत परिश्रम करण्यासाठी युवकात मोठी उर्जा निर्माण करीत होती.

या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठाणचे एकुण ५० व परंडा शहरातील या प्रतिष्ठान सलंग्न १५ जण आशा एकुण ६५ जणांनी रविवारी सकाळी ८ वाजल्यापासुन मोठे परिश्रम घेत आतील किल्लाभागातील स्वच्छता मोहिम दिवसभर राबविली.याबद्दल ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात असलेल्या शिवमंदीरच्या शिवसेवा समितीच्यावतीने सह्याद्री प्रतिष्ठाणच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने राज्यातील इतर गटकोट,भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहिम हाती घेवुन राबविली आहे.एकुण १८ गडकोट,भुईकोट किल्ल्यात लोकवर्गणीतुन महादरवाजे,तोफगाडे बसविण्यात आले आहेत.मागील १४ वर्षापासुन सह्याद्री प्रतिष्ठान गडकोट संवर्धनाचे कार्य करत आहे.

या परंडा भुईकोट स्वच्छता मोहिमेचे नियोजन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष आशिष पताळे-पाटील,जिल्हा प्रशासक अविनाश पोफळे,सहप्रशासक अक्षय जाधव यांनी केले होते.एकुण ६५ दुर्गसेवकांनी किल्ला स्वच्छतेसाठी सहभाग घेतला होता.

Related posts

सर्व जातीपातीच्या सर्वपक्षीय आमदारांच्या घरावर ‘मतदान बहिष्कार मोर्चा’ काढणार -योगेश केदार …… ‘अकलूज येथे मराठा वनवास यात्रा बैठकीचे आयोजन’ ‘

yugarambh

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – डॉ. नितीन राऊत

yugarambh

PM Modi in Rajyasabha : PM मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर निशाणा, भाषणातील प्रमुख मुद्दे…

Admin

काँग्रेस नसती तर… ; राज्यसभेतील भाषणात पंतप्रधानांचा हल्लाबोल

Admin

उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी गाऱ्हाणे

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज प्रशालेत -“हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती साजरी

yugarambh

Leave a Comment