अकलूज (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ भारत अभियान व आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद अकलूज यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत जि. प. प्रा. मुलींची आदर्श शाळा नं. १अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूरची सातवीतील विद्यार्थिनी गिरिजा बाळकृष्ण टेके हिने ‘मी वसुंधरा बोलतेय’ विषयावर आपल्या वक्तृत्वातून वसुंधरेचे मनोगत उत्कृष्टपणे मांडले. या स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकाविला.
याबद्दल नगर परिषद अकलूजचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्या शुभ हस्ते रोख रु. २००१/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गिरिजा टेके हिला गौरविण्यात आले. तसेच याच शाळेची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी श्रुती लक्ष्मण सदाफुले हिने याच वक्तृत्व स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल रोख रु.१००१/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात आले.
तसेच कै. मारुतीराव पवार बहुद्देशीय संस्था व पवार हॉस्पिटल पिलीव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव २०२२ निमित्ताने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गिरीजा टेके हिने इ. ५वी ते ७वी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. याबद्दल कै. मारुतीराव पवार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपराव पवार यांच्या शुभहस्ते रोख रु.५०१/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गिरिजाचा सन्मान करण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धेसाठी पदवीधर शिक्षक कैलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल गिरीजा व श्रुतीचे मुख्याध्यापक मोहन इंगोले, केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव व पंचायत समिती माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.