December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

संग्रामनगर (प्रतिनिधी )-आज दिनांक 8 मार्च हा जागतिक महिला दिन शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या सौ.मंगलताई वाघमोडे व प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ.अर्चनाताई शिंदे होत्या. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ.शितलताई वाघमोडे,सौ.शोभाताई वाघमोडे,गावातील व परिसरातील बहुसंख्य महिला, तसेच शा.व्य.समीतीचे अध्यक्ष श्री. धनंजय वाघमोडे, उपाध्यक्ष श्री. श्यामराव आरडे, सदस्य व सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.*

 

व्यासपीठावरील उपस्थित महिलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाळासो शिंदे यांनी केले. त्यानंतर शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गावातील सर्व शाळांमधील शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा वर्कर यांचा सन्मान जि.प.सदस्या सौ. मंगलताई वाघमोडे यांच्या वतीने मानाचा फेटा, मायेची शाल, हार, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.*

 

नंतर शाळेतील मुलींनी कर्तुत्ववान महिलांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट अशी भाषणे व गीत गायन केले. महिलांसाठी मनोरंजनाच्या स्पर्धा घेऊन प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना जि.प.सदस्य यांच्यावतीने जाहीर केलेले बक्षीस सौ. शोभाताई वाघमोडे व व्यासपीठावरील उपस्थित महिलांच्या हस्ते देण्यात आले. चाकोरे व चाकोरे परिसरातील पाच अंगणवाड्यांना मंगल ताई वाघमोडे यांच्या प्रयत्नातून महिला व बाल विकास विभागामार्फत सॅनिटायझर मशीन बसविण्यात आल्या सौ. मंगल ताई वाघमोडे व सौ. अर्चना ताई शिंदे यांच्या वतीने शाळेतील मुलांना खाऊसाठी प्रत्येकी पाचशे रुपयाचे बक्षीस देण्यात आले. गावातील तरुण मंडळाच्या वतीने सर्व महिला व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला.*

 मनोरंजनाच्या स्पर्धांचे नियोजन श्री.भारत लवटे सर, श्री.एकनाथ कदम सर व श्री.प्रदीप राजगुरू सर यांनी केले तर कार्यक्रमाची सुंदरता वाढली ती श्रीम. लता सपकाळ मॅडम व श्रीम.रेश्मा गायकवाड मॅडम यांच्या सुंदर रांगोळी व श्री.निसार पठाण सर यांच्या उत्कृष्ट फलक लेखनाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.बाळासो शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. भारत लवटे यांनी मानले.

Related posts

महाराष्ट्राचं वैभव पंढरीची वारी प्लॅस्टिक मुक्त वारी होणं शक्य आहे.- स्वाती राहुल चव्हाण

yugarambh

श्रीमती विठाबाई रामचंद्र भिलारे यांचे निधन.दत्तात्रय भिलारे यांना मातृशोक

yugarambh

माळशिरस तालुक्यातील विज कामासाठी निधी द्या : आ. रणजितसिंह मोहिते पाटील 

yugarambh

ताराराणीचे पहीले राष्ट्रीय पदक..!-मा. धैर्यशील मोहिते -पाटील

yugarambh

माळीनगर -लवंगची ‘शाही ‘ ग्रामपंचायत निवडणूक

yugarambh

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांनी जपला ग्रामीण भागातील अस्सल मराठमोळा मातीतील खेळ ‘आट्यापाट्या’

yugarambh

Leave a Comment