अकलूज (प्रतिनिधी )-काँग्रेस कमिटीची सभासद नोंदणी उत्साहात सुरू झाली असून जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील स्वतः नुतन सदस्यांची नोंदणी करत असल्याने काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीला बळकटी आली असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.

पूर्ण देशभरात चालू असलेल्या काँग्रेस डिजिटल सभासद नोंदणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी प्रतापगड अकलूज येथे स्वतः मोबाईल वरून हजारो कार्यकर्त्यांची काँग्रेस डिजिटल सभासद नोंदणी करून घेतली..
सोलापूर जिल्ह्यात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष झाल्यापासुन काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस डिजिटल सभासद नोंदणी चालू आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, अण्णासाहेब इनामदार,रणजित देशमुख, अभिषेक कांबळे,सतीश पालकर, जुल्कर शेख,फिरोज देशमुख, धनाजी साखळकर,गौरव एकतपुरे,विठ्ठल इंगळे,सुधीर रास्ते,राहुल जाधव,मोहसीन शेख, मयूर माने, नवनाथ साठे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.