अकलूज (प्रतिनिधी )-नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे साहेब यांची राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून झाली पदस्थापना झाली आहे.
.पुणे जिल्ह्णातील शिक्रापूर येथे जन्मलेले मांढरे हे १९९४ मध्ये परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथे रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी धारणी, बुलढाणा, अकोट, अकोला, कोल्हापूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. पुणे येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी व त्यानंतर मिरजचे प्रांत म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे.
२००५ मध्ये पुणे महापालिकेच्या उपायुक्तपदीही त्यांनी काम पाहिले. राज्य वखार महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक, औरंगाबादला महसूल उपायुक्त, मंत्रालयात महसूल विभागात कार्य अधिकारी तसेच मुख्य सचिवांच्या कार्यालयात सहसचिवपदी त्यांनी काम पाहिले. २०१० मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती देण्यात आली. २०१७ पासून ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत असताना १२ मार्च २०१९ रोजी सूरज मांढरे यांची नाशिक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्याची सूत्रे घेऊन त्यांना तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांची बदली आणखी एक महिना लांबण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.