माळीनगर : (प्रतिनिधी) मौजे- तांबवे ता.माळशिरस येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत असलेल्या वृषाली दिपक सरवळे यांनी कोरोना महामारीच्या काळात कोव्हिड लसीकरण व जनजागृतीचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापना यांच्या वतीने सोलापूर येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला .

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या शमा पवार , स्री रोग तज्ञ डॉ माधुरी दबडे यांच्या सह महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
याबद्दल तलाठी अनिल घेरडे , माळशिरस तालुका तलाठी व कोतवाल संघटना , ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.