December 1, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीय

तरुण व्यवस्थित घडला तर देश आपोआप घडेल…-लखन साठे पेरुवाला

माळीनगर (प्रतिनिधी )-झुंड…..हि एका वास्तवाची कथा मांडताना नागराज मंजुळे सरांनी कुठेही अतिशयोक्ती न करता .जिवंत चित्रपट तयार केला. समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण हेच माध्यम अतिशय उपयोगी आहे .हे अप्रत्यक्ष या चित्रपटात सांगितले आहे. आयुष्यात कोणीही कमी नसतो. प्रत्येकाकडे जग जिंकण्याची ताकद असते. मग गरीब असो अथवा श्रीमंत.

लेखक लखन साठे-दिग्दर्शक नागराज मंजुळे समवेत…

झुंड सिनेमात त्या झोपडपट्टीतील मुलांनी त्यांच आयुष्य खर्ची करत असताना पोटाची आग इझवन्यासाठी जी धडपड करावी लागते .ती धडपड चांगली की वाईट याची जाणीव करून देणारे बोराडे सरांची व त्या मुलांची झुंड ही आधुनिक युगातील सत्यकथा .त्यातील त्या तरुण मुलांचं कुणाला काय वाटणार ? आणि ज्यांना त्यांचं दुखणं कळाल.त्यांना ही असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. साऱ्या जगाला या तळागाळातील लोकांचं दुखणं कळलं तर मार्ग दाखवणारे झुंड चित्रपटातील बोराडे सरांसारखे अनेक म्होरके तयार होतील. अश्या जमिनीवरील गोष्टी सांगितल्या तर बोराडे सरांसारखे अनेक समाजहितासाठी झटनाऱ्या लोकांची फळी निर्माण होईल. त्यांना येणाऱ्या अडचणीही कमी होतील .आणि समाजातील प्रत्येक्ष अप्रत्यक्ष असणाऱ्या शैक्षणिक आणि आर्थिक विषमतेच्या भिंती आपोआप ढासळतील.

अनेक ठिकाणी विषमतेच्या चिखलात तडफडत असणाऱ्यांचा श्वास घ्यायचा मार्ग मोकळा आणि सोपा होईल. डिजिटल युगा पासून दूर असणाऱ्या अनेक जीवांची घुटमळ कमी होईल. एक शिक्षक निवृत्तीच्या काळातही त्यांच्या कॉलेजमध्ये नसणाऱ्या तरुणांना स्वतः चे जीवनमान उंचावण्यासाठी आपली संपूर्ण ताकद कशी लावतो हे पाहण्यासाठी.. प्रत्येकानी हा चित्रपट पहावा.प्रत्येकांनी सिनेमागृहात येऊन पहावा..तरच असे परत परत नवं नवे अनेक सिनेमे तयार होतील .

 

वास्तविक पाहता चित्रपट पाहणारा हा निरनिराळ्या तऱ्हेचा रसिक .त्याचा मूळ हेतू मनोरंजन.अन ते होते ही. त्या बरोबर अनुकरण पण होते.आणि एक दिवस त्या सिनेमाचं वारं संपल की ते ही अनुकरण ही संपून जाते..

या ठिकाणी चित्रपट साहित्याचा मूळ हेतू निर्मिती संस्थेने बदलला पाहिजे. फक्त व्यवसाय म्हणून पैसे मिळवायचा मानस ठेवून चित्रपट केला तर झुंड सारखे विषमतेचे मूळ नष्ट करणारे त्याचे मार्मिक दर्शन घडविणारे चित्रपट तयार होणार नाहीत. ती विषमता मिटवण्याची धारणा लोकांच्या मनात येणार नाही. तसे पाहिले तर अनेक माध्यम या ठिकाणी आहेत. ही विषमता दूर करण्यासाठी .परंतु चित्रपट माध्यम हे सर्वात प्रभावी ,अनुकरणीय माध्यम आहे.

म्हणून चित्रपट निर्मिती क्षेत्रात हा बदल आता या घडीला होणे जरुरीचे वाटते .आणि काही अंशी ते घडताना दिसत आहे ..हे झुंड सिनेमा पाहिल्यावर समजते .

विषमतेच्या अभेदय भिंती पाडायला तयार होणाऱ्या मनाच्या भावनिक स्थितीच्या ताकतीचा आणि त्याच्या उपयोजनाच्या संदर्भ साहित्याचा पाठ नागराज सरांच्या सिनेमात आढळतो.

तरुण पिढी घडविण्यासाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात झुंड चित्रपट निर्मिती केलेल्या प्रोडक्शन सारखे अनेक चित्रपट निर्मिती संस्था तयार होवोत.

ज्या समाजाचा आरसा दाखवनाऱ्या लेखक /दिग्दर्शक यांना संधी देतील.

येथील तरुण व्यवस्थित घडला तर देश आपोआप घडेल..

 लेखन  -लखन साठे पेरुवाला 

मो-9665040095

Related posts

सुवर्णकन्या ऋतुजा संपत भोसले यांच्या स्वागतासाठी लवंगचा युवा वर्ग पुणे येथे रवाना

yugarambh

पंतप्रधान मोदी यांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात संताप; सोशल मीडियावर पडसाद

Admin

Prakash Ambedkar : देशात कोरोना मोदी घेऊन आले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप 

Admin

मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यात ‘मोदी माफी मागो’ आंदोलन : नाना पटोले

Admin

IPL 2022 , Jio चे काही खास डेटा प्लॅन

yugarambh

आनंदी देशांच्या यादीत भारताचे ‘अखेर’ नाव आलेच…

yugarambh

Leave a Comment