माळीनगर : गणेशगांव (ता. माळशिरस) येथे मारहाणीच्या घडलेल्या दोन वेगवेगळ् घटनासंदर्भात अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. एका प्रकरणात अनुसूचित जाती उसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण सोपान यादव, वय 54 रा.गणेशगांव यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे, 17 मार्च रोजी विठ्ठल नलवडे, तुकाराम नलवडे, बाळु ठोकळे यांनी घरी येऊन माझ्या खिशातील 27,000/ रूपये जबरदस्तीने काढुन घेतले व “तुम्ही यापुढे जर आमच्या नादी लागला तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देऊन मोटारसायकलवर निघून गेले. या घटनेची माहिती मी शरद मोरे, माऊली मदने, सागर मोरे यांना फोन करून सांगितली. यावेळी शरद मोरे यांनी ही त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेची माहिती देत सांगितले की, जोतीराम रामदास नलवडे, विशाल नलवडे या लोकांनी मारहाण करून त्याचे गळ्यातील 5 तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली व बाळु पानसरे व जोतीराम नलवडे व विशाल नलवडे यांना त्यांने व बाळु पानसरे असे दोघे चैन मागत असताना बाळु पानसरेला तुकाराम नलवडे याने पाठीवर व हातावर गजाने मारहाण करुन त्यांनाही जिवे ठार मारण्याची धमकी देवुन निघुन गेले असल्याचे सांगितले आहे.
लक्ष्मण सोपान यादव यादव यांच्या या फिर्यादीनुसार विठ्ठल शिवाजी नलवडे 2) तुकाराम शिवाजी नलवडे 3) ज्योतीराम रामदास नलवडे 4) दशरथ रामदास नलवडे 5)आप्पा चांगदेव नलवडे 6) विशाल नामदेव नलवडे 7) बाळू भिमराव ठोकळे 8) तुकाराम महादेव सोनलकर 9) सिताराम मारुती शेंडगे सर्व राहणार गणेशगाव तालुका माळशिरस यांच्यावर अकलूज पोलीस ठाणे गु र नंबर 176/2022 भादवि कलम 143, 147, 148, 149, 324, 327, 452, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सह. पो. निरीक्षक मारकड करीत आहेत.
दुसऱ्या घटनेमध्ये बाळासाहेब भीमराव ठोकळे वय 50 वर्षे रा.गणेशगांव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाळासाहेब ठोकळे हे ग्रामदैवत श्री गणेश मंदिरास आसनांचे 14 व्या वित्त आयोगाकडून मंजूर झालेल्या पत्राशेड मारण्याकरता गणेश मंदिराचे परिसरामध्ये खड्डे घेत असताना सदर ठिकाणी सागर तानाजी मोरे 2) शरद महादेव मोरे 3) गणेश लक्ष्मण यादव, 4) माऊली मदने, 5) नसिर हुसेन शेख, 6) अर्षद सर्फ शरफुद्दिन कोरबु, 7) विजय मनोहर यादव सर्व राहणार गणेशगाव यांनी येऊन ठोकळे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ केली असल्याच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर अकलूज पोलीस ठाणे गु र नंबर 175/2022 भादवि कलम 143 147 149 323 504 506 सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 3 (1) (आर), 3 (1) (एस), 3 (2) (व्ही.ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेसंदर्भातील पुढील तपास अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ बसवराज शिवपुजे करीत आहेत.