माळीनगर(प्रतिनिधी )-युवा उद्योजक किर्तीध्वज उदयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माळीनगर येथील निंबाळकर काॅम्लेक्स याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून यात एकूण 101 रक्तदात्यांनी सहभाग घेतल्याचे आयोजक गणेश निंबाळकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास डाॅ.बाहुबली दोशी,डाॅ राजीव गांधी,डॉ प्रशांत निंबाळकर,डाॅ अस्लम शेख, डॉ विजयकुमार कोकाटे, डाॅ संभाजी हाके, डाॅ फारूख शेख शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बॅक अकलूजचे संपर्क अधिकारी तुषार साबळे,मुस्लिम समाज नेते शमशुद्दीन शेख, स.म. साखर कारखान्याचे संचालक मोहनराव लोंढे, स.म.साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र निंबाळकर,धनाजी जाधव,शिवशंकर बझारचे जनरल मॅनेजर गोपाळ देशमुख,दिपक शेंडगे,राजू देवकर सर,रोहिदास सोनवणे,अनिल उघडे,राहुल बोबडे,अर्जुन भुसारे विक्रम लवटे आदी उपस्थित होते.