माळीनगर,(प्रतिनिधी )-जागतिक महिला दिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून माळीनगर महिला मंडळाने येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी विविध क्षेत्रात दैदीप्यमान कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन लेखिका व सौंदर्य स्पर्धा आयोजक सुप्रियाताई ताम्हाणे व अभिनेत्री,नृत्य दिग्दर्शिका जुई सुहास यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी माळीनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता जाधव,उपाध्यक्षा लीना गिरमे,जयश्री झगडे,सचिव साधना रासकर,हेमलता खताळ,खजिनदार छाया यादव,सदस्या प्रमिला रासकर,उज्वला पांढरे,साधना गिरमे,नीलम पांढरे, नलिनी नवले,वंदना भरविरकर,कविता पांढरे,सारंगा गिरमे,राजश्री जगताप,भाग्यश्री इनामके,रुपाली शिंदे उपस्थित होत्या.
यावेळी सुहिता गिरमे,रुपाली बोरावके ,वंदना भरविरकर,सारंगा गिरमे ,शमा भोंगळे,सिद्धी ताम्हाणे,सानिया बोरावके यांना सन्मानित करण्यात आले.
सुप्रिया ताम्हाणे यांनी स्वतः लिहिलेल्या कथा,कविता व पोवाडा यांचे सादरीकरण केले.जुई सुहास यांनी महिलांच्या फनी गेम्स घेऊन रॅम्प वॉकचे सादरीकरण केले. प्रास्ताविक संगीता जाधव यांनी केले. सूत्रसंचालन वंदना भरविरकर यांनी केले.आभार हेमलता खताळ आभार मानले.