December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

नाे कंमप्लेन डे टीम चे मा.धवलसिंह माेहीते पाटील यांच्याकडून कौतुक..! 

माळीनगर (प्रतिनिधी )-संपूर्ण भारतात पहील्यांदा नाे कंमप्लेन डे साजरा करून यशस्वी अभियान राबविण्यासाठी अकलूज पाेलीस स्टेशन च्या माध्यमातून अकलूज शहर विभागाची निवड करून यशस्वीपणे राबवल्यामूळे आज दिनांक १९ मार्च २०२२ राेजी संध्या ०६।०० वाजता मा.डाँ धवलसिंह माेहीते पाटील, संस्थापक जनसेवा संघटना व मा. जिल्हाध्यक्ष काॅंग्रेस आय कमिटी यांनी या अनाेख्या चांगल्या उपक्रमाची दखल घेवून आज खास अकलूज येथील निवासस्थानी प्रतापगडावर बाेलावून संपूर्ण नाे कंमप्लेन टीम चा सत्कार व काैतूक करून हार घालून अभिनंदन करून पूढील वाटचालीस टीमला शूभेच्छा दिल्या.

   या उपक्रमाने समाजात नवी दिशा व प्रेरणा देण्यासाठी पाेलीस मित्रपरीवाराने पूढाकार घेतला हाेता त्यात सूमारे ४०० ते ४५० पाेलीस मित्र ग्रामसूरक्षा सदस्य एनसीसीविदयार्थी, व्यापारी वर्ग डाॅक्टर्स व वकील शाळेतील शिक्षक व सामाजीक संघटना विविध पक्ष असे सकाळी ०६।०० ते संध्या ०६।०० पर्यंत मन लावून काम करीत हाेते.काही लाेक राेडवर तर काही चाैकाचाैकात बसलेले हाेते या ६ मार्च २०२२ राेजी काेणतेही भांडण तंटे वाद अपघात हाेवू नये काळजी घेत हाेते व मनपरीवर्तन करून वाद टाळला हाेता. मिटवला हाेता.

जगाला यूध्दाची नाही तर शांततेची गरज आहे .हा दिवस शांतता दिवस म्हणून यशस्वी करून झाला आहे. याची दखल अनेक मान्यवरांनी व लाेकनेत्यांनी घेतलेली आहे. व नाे कंमप्लेन डे साठी या टीमला आमंत्रीत केलेले आहे . यात काेणताही राजकीय भाग या उपक्रमात नसल्यामूळे याला समाजातील सर्व राजकीय पक्षांनी व सामाजीक संघटनानी भरीव पाठींबा दिलेला आहे हेच यश आहे

याचाच भाग म्हणून आज मा. डाॅ.धवलसिंह माेहीते पाटील यांनी टीमचा सत्कार केला व प्रशंसापत्र सन्मानाने प्रदान केले.

भविष्यात हा दिवस संपूर्ण ३६५ दिवस कसा राबविता ये़ईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहीजे असे प्रतिपादन यावेळी केले आहे सर्व टीमच्या वतीने अकलूज पाेलीस स्टेशनचे पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील यांनी प्रशंसापत्र स्विकारलेले आहे आता अकलूजचा हा शांततेचा संदेश नाे कंमप्लेन डे लवकरच जिल्हाभर व महाराष्ट्रभर व भारतभर राबविला जाईल यात शंका नाही.

Related posts

महर्षि संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

yugarambh

शिवामृत-चेअरमन मा.धैर्यशील(भैय्यासाहेब) मोहिते पाटील व व्हॉईस चेअरमन पदी मा.दत्तात्रय भिलारे(भाऊ )

yugarambh

सोलापूर जिल्ह्यात चारा डेपो चालू करा युवा सेनेची मागणी.अन्यथा उग्र आंदोलन -गणेश इंगळे

yugarambh

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विविध मागण्यांसाठी निवेदन

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेत विविध उपक्रमांनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

yugarambh

‘झुंड’चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष

Admin

Leave a Comment