अकलूज (युगारंभ ): शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवकिर्ती युवा मंच वतीने अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व जिल्हा परिषद शाळेतील 1750 विद्यार्थ्यांना सुमारे 10,000 वह्या व दोन हजार पेन चे वाटप शिवशंकर बाझारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गट शिक्षण अधिकारी धनंजय देशमुख शिवकिर्ती युवा मंचचे उपाध्यक्ष अनिल उघडे, नितीन बनकर उपस्थित होते.
दिनांक 17 मार्च पासून तालुक्यातील विविध भागात किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. माळीनगर येथे शिवकिर्ती युवा मंच चे कार्याध्यक्ष सज्जन दुरापे, गणेश निंबाळकर, दीपक शेंडगे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले. वाघोली येथील तीन जिल्हा परिषद शाळेतील 250 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगवान मिसाळ, सतीश शेंडगे, दीपक शेंडगे, योगेश शेंडगे उपस्थित होते.
गारअकोले येथे ग्रामपंचायतीच्या वतीने बसवण्यात आलेल्या आर.ओ. फिल्टर चे लोकार्पण शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गोविंद पवार यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 91 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवाय महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील बक्षिसाचे वितरण देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच शिवकिर्ती युवा मंच च्या वतीने नवरंगे शासकीय बालक आश्रम व प्रभाहिरा पालवी बालक आश्रम पंढरपूर येथील अनाथ व एड्सग्रस्त मुलांना स्नेहभोजन देण्यात आले.
सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवकिर्ती युवा मंच चे उपाध्यक्ष अनिल उघडे, सज्जन दुरापे, राहुल बोबडे, प्रकाश गायकवाड, प्रीतम एकतपुरे, मनोज क्षीरसागर, नागेश बनकर, सचिन नरसाळे, राहुल नागणे यांनी विशेष परिश्रम घेतले.