सोलापूर(युगारंभ ): राज्यशासनाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ करिता यतीन शहा (उद्योगपती), डी. राम रेड्डी (उद्योगपती )व माझी वसुंधरा अभियांन करिता मारुती चितमपल्ली (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ ) , सचिन खरात ( चित्रकार)यांची सोलापूर महानगपालिके कडून “Brand Ambassador” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरील निवड करण्यात आलेले व्यक्ती हे अराजकीय, सन्माननीय, कर्तुत्ववान, सुप्रसिद्ध व्यक्ती समाजावर प्रभाव पाडणारी आहेत. यांची नियुक्ती जर सोलापूर महानगरपालिके कडून “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” व माझी वसुंधरा अभियांन यांच्या करिता केल्यास यांचा फायदा या योजनेच्या प्रसार व प्रसिद्धी करणे कामी करता होईल.