अकलूज (युगारंभ ):नव्याने स्थापन झालेल्या अकलूज नगरपरिषदेची प्रभाग रचना निश्चित करण्यात आली. ४५ हजार १२४ लोकसंख्या असलेल्या अकलूज नगरपरिषदेसाठी १३ प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक याप्रमाणे २६ सदस्य निवडले जाणार आहेत.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशान्वये प्रभाग रचनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, स्त्रियांसाठीही जागा निश्चित केल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ६, स्त्रियांसाठी १३ जागा राखीव ठेवल्या आहेत. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी 3 व सर्वसाधारण स्त्रियांसाठी १० जागा निश्चित केल्या आहेत.
प्रभाग क्र. १: गिरमे वस्ती, बोरावके वस्ती, संत नरहरी नगर, आंबेडकर नगर, दत्त नगर, राऊत नगर, शिवकृपा कॉलनी, जयशंकर नगर, निरामाई नगर, के. एल. गिरमे प्लॉट, भोरी वसाहत.
प्रभाग क्र. २ : अकलाई स्मशानभूमी, जगताप वस्ती, पांढरे वस्ती, समतानगर, कर्मवीर चौक, कृष्णप्रिया नगर, बारभाई गट.
प्रभाग क्र. ३ : देशपांडे घाट अकलाई मंदिर कमान, अकलाई नगर, घाट. रामबाग वसाहत, पंचशीलनगर, शिवाजी चौक, रामायण चौक, गुरुनगर, होनमाने प्लॉट, ढोर गल्ली, रणजित नगर शाळा.
प्रभाग क्र. ४ शनिमंदिर, देशमुख घाट, देशपांडे घाट, शिवाजी चौक, रामायण चौक, कुर्डुवाडी-माळशिरस रोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, काझी गल्ली,
प्रभाग क्र. ५ : नामदेव मंगल कार्यालय, आव्हाड बोळ, लोणार गल्ली, शिवापूर पेठ, नगरपरिषद कार्यालय, काझी गल्ली, शनि मंदिर घाट.
प्रभाग क्र. ६: विजय चौक, जयशंकर उद्यान, नौशाद बोळ, ईदगाह मैदान, कॅप्टन शेती, जोशी गल्ली, वडर गल्ली,लोणार गल्ली, खडके प्रेस.
प्रभाग क्र. ७ : सोनाज पंप, गांधी चौक, पवार वस्ती, नायर झोपडपट्टी,स्विमिंग टैंक, नागोबा कट्टा, विकास नगर.
प्रभाग क्र. ८: जयसिंह चौक, गांधी कार्यालय, आव्हाड बोळ, लोणार चौक, महावीर स्तंभ, धर्मवीर सदुभाऊ नगर परिसराचा समावेश आहे.महर्षी चौक, लक्ष्मीनारायण नगर, गिरझणी चौक,
प्रभाग क्र. ९ गांधी चौक, जुने बसस्थानक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महर्षी कॉलनी, इंदिरा नगर, इरिगेशन कॉलनी, बॅकवर्ड हौसिंग सोसायटी, उपजिल्हा रुग्णालय.
प्रभाग क्र. १० अमरदीप हॉटेल, धर्मवीर सदुभाऊ चौक, राजइंदिरा कॉम्प्लेक्स, गणेशनगर कमान, व्यंकटनगर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक.
प्रभाग क्र. ११ शिवरत्न मोटर्स, धर्मवीर सदुभाऊ चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक, गणेशनगर परिसर.
प्रभाग क्र. १२ : सुजयनगर सर्व भाग, पोलीस कॉलनी, विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल, फुलेनगर, स्टार इमेजीन सेंटर, सह्याद्री आयटीआय, शिवाजीनगर, पटेल टिंबर, शंकरराव मोहिते महाविद्यालय.
प्रभाग १३: शांतीनगर, बनकरवस्ती, दत्तनगर, कॅगार प्लॉट, विद्यानगर, अहिल्या नगर, अर्जुननगर, गावठाण, संजयनगर, बोडकेवस्ती, मोरेवस्ती, तोरसकरवस्ती, मुलाणी वस्ती, सावता माळी मंदिर, साई पार्क, सयाजीराजे नगर परिसराचा समावेश आहे.