चाकोरे/ प्रतिनिधी-रंगपंचमी हा सण सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सर्व शाळा विद्यालयातून हा सण साजरा केला जातो.बालचमू मोठ्या उत्साहात सहभागी होतात.
परंतू रासायनिक रंगांचे अनेक दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्यात यावां असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतेच जिप सोलापूर शिक्षण विभागास दिले त्यांच्या सूचनेनुसार रंगपंचमी हा सण नैसर्गिक रंगाच्या साह्याने साजरा करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांनी सर्व तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी आदेश देण्यात आले.त्यानुसार दिनांक 21 मार्च रोजी नैसर्गिक रंग बनविणे कार्यशाळा घेण्यात आल्या.
या दिवशी नैसर्गिक रंग खेळून आनंद अनुभवता यावा. या अनुषंगाने फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार करण्याचे मुलांना या कार्यशाळेत दाखविण्यात आले.
आनंदनगर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकोरे , खरातवस्ती,महादेव माने वस्ती इ शाळांमधून कार्यशाळा उत्साहात पार पडल्याचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप राजगुरु यांनी सांगितले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी बाळू शिंदे,प्रवीण गायकवाड ,तात्याराम कुंभार,रामभाऊ काटकर ,भारत लवटे,निसार पठाण,मोहन बाबर,अशोक राजगुरू, दत्तात्रय टकले,जगदीश जाधव, प्रमिला पावसे ,निलम भांगरे ,एकनाथ कदम यांनी कष्ट घेतले
आमचे मार्गदर्शक जिल्हा मुख्याधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे तसेच माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.यामध्ये नैसर्गिक घटकांपासून रंग तयार करून मुलांना दाखवण्यात आले सर्व मुलांनी आम्ही रंगपंचमीला नैसर्गिकच रंग बनवणार व त्याचाच वापर करणार असल्याचे सांगितले.
संतोष कोले- केंद्रप्रमुख ,आनंदनगर