आज जागतिक कविता दिवस….
महाराष्ट्रातील नवोदित लेखक व कवी … मंगेश पोरे
सध्या ते सांगोल्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.
वेगळ्या धाटणीचा हा कवी माणसांत जितका रमतो तितकाच शब्दांतही….
विविध विषयावंर सखोल व सहजपणे लिहणाऱ्या या कवी मित्राच्या या काही कवितेच्या ओळी…
पालकसभा आन भूक…
शाळेत जात हुतो तवा
पालकसभेची नोटीस…
जवा-जवा बी म्या घरी,
माह्या माय-बा ला दावायचो…
बा आन माय
त्यो ‘आडाणी कागूद’ म्होरं धरुन…
खोचलेल्या डोळ्यांनी एकंच प्रश्न इचारीत,
” बाळा,आजचं दुपारचं कोरड्यास तिकडं मिळलं काय रं…??”
शरीर अन् खरं प्रेम…
“माझ्यावर प्रेम केलंस की माझ्या शरीरावर??”
हा प्रश्न तू कित्येक दिवसांनी विचारलास.
माझ्याकडं उत्तर नव्हतं असं नाही,
…पण त्याचा अर्थ तुला कळेलच असं नव्हतं!
——————–
तुझं शरीर नसतंच तर मी प्रेम कशावर केलं असतं??
आणि….
आत्म्यावर प्रेम करावं तर तो अमर असतो पण जिवंत असेलंच असं नाही!!!