आपल्या दिव्यदृष्टीत आहे,स्वप्न उत्तुंग भरारी घेण्याचे…
हाती घेऊ त्याचं सोनं करण्याचे…..
उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील साहेब यांचा वाढदिवस….
पंगत चुकली तर एक वेळचे जेवण चुकेल,
पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकेल…
यासाठी योग्य माणसाच्या सहवासात राहणे ही काळाची गरज आहे .प्रत्येकाला आपुलकीने वागवणारे खंबीरपणे साथ देणारे. आमचे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय किर्तीदादा.
कार्यकुशल, दमदार, सक्षम आणि कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे आदरणीय दादासाहेब. दादासाहेब याच्या सहवासात राहिल्यामुळे आयुष्याचं सोनं होतं अशी अनेक उदाहरणे आहेत. साहेबांच्या सहवासामुळे माणूस स्वावलंबी बनतो.
दादासाहेब म्हणजे कणखर स्वाभिमानी आणि दूरदृष्टीचे नेतृत्व आहे . स्पष्ट बोलणे, धाडसी निर्णय, तत्पर अंमलबजावणी म्हणजे आदरणीय दादासाहेब.
एक वेळ जेवण कोणीही देईल पण आयुष्याची शिदोरी देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय दादासाहेब.
उद्योग व्यवसायातही दादासाहेबांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन , इन्फ्रास्ट्रक्चर, हॉटेल त्याचबरोबर शेतीतही दादा साहेबांचं विशेष असे लक्ष असते.
माणूस मंदिरामध्ये गेल्यानंतर लाखो करोडो रुपये मिळावे अशी देवाकडून अपेक्षा करतो. त्यासाठी मंदिरातील दानपेटीत माणूस खिशातील काही रक्कम देतो .मात्र या देवापाशी काही न देता माणसाच्या आयुष्याचं सोनं होतं .
आपल्या जवळच्या आणि सहकाऱ्यांचे चांगलं व्हावं अशी मनापासून दादासाहेबांची अपेक्षा असते त्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे दादासाहेब उभे असतात. संकट काळात दादा सदैव साथ देतात. असे हे व्यक्तिमत्त्व आहे. अशा या दूरदृष्टीच्या दादा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
💐💐💐 आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो हिच छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आदरणीय दादासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐
लेखन व शुभेच्छुक- श्री. सज्जन मोहन दुरापे (साळुंखे)
कार्याध्यक्ष शिवकिर्ती युवा मंच