माळीनगर (युगारंभ )- 23 मार्च ‘शहीद दिन’ दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर प्रशालेमध्ये साजरा करण्यात आला.
क्रांतिवीर भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षिका स्वाती घोडके,शिक्षक वसंत पिंगळे, सत्यवान साळुंखे,सचिन हजारे यांचे हस्ते करण्यात आले. शास्त्र विभागातील विद्यार्थी वरद जाधव याने भाषण केले तर महेश शिंदे यांनी
“ही भूमी माझी आई,
हा देश माझा पिता,
हृदयावर लिहू आता,
शहिदांची प्रेम गीता”
हे सुंदर देशभक्तीपर गीत सादर केले.
कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य गिरीश ढोक, उपप्राचार्य प्रकाश चवरे, शिक्षक महादेव एकतपुरे, अर्जुन क्षीरसागर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश शिंदे, संजय बांदल आदींनी परिश्रम घेतले.