अकलूज (युगारंभ )-राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार २५ मार्च रोजी राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य कार्यकारणी सदस्य सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त विधान भवन पुणे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अकलूज, तालुका- माळशिरस जिल्हा- सोलापूर येथील अकलुज क्रिटीकल केअर अँड ट्रॉमा सेंटर या हॉस्पिटलची आरोग्य विभागाच्या उच्चाधिकार समिती मार्फत चौकशी होऊन कारवाई करणेबाबत व अकलूज नगरपरिषदेच्या विविध मागण्यांसंदर्भात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते..
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विभागीय उपायुक्त संतोष पाटील यांना भेटून मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर मागण्या मान्य न केल्यास पुढील आंदोलन मंत्रालय मुंबई व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयासमोर हलगीनादसह बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे राज्य कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे, पक्ष प्रवक्ता व पुणे शहराध्यक्ष प्रकाश भालेराव, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, बारामती तालुका अध्यक्ष आनंद लोंढे,सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजीत सरवदे,अमीनभाई शेख,मावळ तालुका अध्यक्ष परशुराम डोडामनी,माळशिरस तालुका अध्यक्ष सचिन कांबळे, कार्याध्यक्ष हेमंत कांबळे,युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड,सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख नवनाथ हुंबे,माढा तालुका संपर्कप्रमुख अतुल शिंदे, माळशिरस तालुका सरचिटणीस दयानंद धाइंजे,सोलापूर शहर कार्याध्यक्ष अनिल सोनकांबळे, शहर संघटक शरणू हजारे, माळशिरस तालुका संघटक पांडुरंग चव्हाण,तालुका संपर्क प्रमुख शिवम गायकवाड, तालुका उपाध्यक्ष शरद साठे, अकलूज शहर कार्याध्यक्ष स्वप्नील शिरसट, शहर संपर्क प्रमुख शिवाजी खडतरे, शहाजी खडतरे, रवी कोळी, अशोक कोळी, अर्जुन कोळी, राजू बागवान,सागर धाइंजे,पै.संतोष गायकवाड, ऋतुराज थोरात, अभिषेक शिंदे,वैभव अंभोरे, आदेश थोरात,अनिकेत शिंदे, गणेश साळवे, संदीप पवार, ऋषिकेश गायकवाड,सुरज कांबळे,अजय साळुंखे, उमेश वाघमारे,अजय जाधव,समीर शेख, अक्षय वाघमारे,प्रशांत भोंडवे दत्तात्रय कांबळे आशिष शर्मा अण्णा साठे दादा भोसले आर्यन कडवळे गणेश चोरघडे नाना पाटोळे साई शिंदे शिवम शिंदे साजन खंडागळे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते