December 1, 2023
yugarambh
Breaking News
राज्य

वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई – राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

बारामती (युगारंभ )-राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार यांनी आज रविवारी रात्री १२ वाजतापासून दोन दिवसीय(२८ आणि २९ मार्च) संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अर्थात *मेस्मा* कायदाला गू केला असून हा प्रस्तावित संप करण्यास मनाई केली आहे.

 महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात *मेस्मा* लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने आज राजपत्रात प्रसिद्ध आदेशात म्हटले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही,अशी ठाम भूमिका वेळोवेळी घेतली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांनाही राज्याच्या ऊर्जा विभागाने, राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे.

उन्हाळ्यातील वाढलेले तापमान,१० आणि १२ वीच्या परीक्षा,विविध पीकांना पाण्याची असलेली गरज या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पूरवठा मिळावा म्हणून वीज कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचारी यांनी संपावर जाऊ नये असे आवाहनही यानिमित्ताने राज्य शासनाने केले आहे.

Related posts

केंद्र सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा भांडापोड करण्यासाठी होऊ द्या चर्चा- राहुल चव्हाण पाटील

yugarambh

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – डॉ. नितीन राऊत

yugarambh

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे प्रकरण;घटनापीठाच्या केसेसचं लाईव्ह प्रक्षेपण होणार… लिंक पहा

yugarambh

नमामि चंद्रभागा प्रकल्पांतर्गत निरा नदीचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण व्हावे.-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

yugarambh

PM Modi in Rajyasabha : PM मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर निशाणा, भाषणातील प्रमुख मुद्दे…

Admin

माळीनगर शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशा राजेंद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श सेवा निवृत्त मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान.

yugarambh

Leave a Comment