बारामती (युगारंभ )-अन्यायाच्या विरोधात रणागंणात लढुन न्याय मिळवुन घेणारेच संप करतात.संयुक्त कृती समितीतील पदाधिकाऱ्यांनी सासवड,केडगाव व बारामती विभागीय कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता व ऊर्जा भवन बारामती येथे दुपारी 1.30 वाजता निदर्शने करून 100% संप यशस्वी करण्याची मागणी.
दि 28,29/3/2022 रोजी बारामती मंडळातील लढाऊ संयुक्त कृती समितीतील पदाधिकारी सभासदांनी *दि 27/3/2022 रोजी राञी 00:00 पासुन संपात सहभागी व्हायचे आहे उद्या सकाळी 10:00 वाजले पासुन बारामती सासवड व केडगाव या ठिकाणी संयुक्त कृती समितीतील पदाधिकारी यानी सर्व सभासद बंधु भगिनीना संपात 100 टक्के भागीदारी करून घेण्यासाठी सर्तक राहुन संप यशस्वी करायचा आहे*
याची जबाबदारी संयुक्त कृती समितीतील प्रत्येक पदाधिकारी सभासदाची आहे *सर्वानी आपापल्या विभागीय कार्यालयासमोर उद्या सकाळी 10:00 वाजले पासुन निदर्शने करत संपात सहभागी करणे संपात जो कोन येणार नाही त्याची नोंद प्रत्येक पदाधिकार्याने घेऊन सर्कल झोन केंद्रीय पदाधिकारी पर्यंत कळवायची आहे*
मिञानो वीजक्षेञाचे खाजगीकरण झाले तर एवढ्या मोठ्या पगारावर खाजगी मालक तुम्हाला नोकरीवर ठेवील काय ? भिवंडीतील टोरॅटो कंपनीने आपल्या लोकाना सांगीतले की तुम्हाला जादा पगार देतो त्यावेळी आपल्या कंपनीची लोक भुलली गेली आणि दोन वर्षानी सर्व HT,LT लाईनची माहीती करून घेतली आणि सक्तीने नोकरीवरून घरी पाठवले मग त्याचे काय हाल झाले असतील याचा विचार करा म्हणुन वीज क्षेञाचे खाजगीकरण झाले तर झोपेचे सोंग घेतलेल्या संघटना काय करणार आहेत जरा विचार करा हजारोंच्या संख्येने आम्हाला वीजकामगार,अधिकारी,अभियंता, आऊट सोरसिंग कर्मचार्याचे फोन आले आहेत की आमच्या कायम स्वरूपी नोकरीसाठी लढणार्या संघटने बरोबर आम्ही आहोत *आम्ही संपात सहभागी आहे* संयुक्त कृती समितीतील पदाधिकार्यांनी सर्वाना सांगितले *दोन दिवसाचा पगार गेला तरी चालेल पण खाजगीकरण झाले तर आपली कायम स्वरूपाची नोकरी गेल्या नंतर काय कराणार* याचा बारकाईने विचार करा म्हणुन संपात उतरा आपण पळपुटे नाहीए याची जाणीव ठेवा आणि दोन दिवसाचा संप यशस्वी करा ही नम्र विनंती.
*लढणारे फक्त मावळेच असतात आणि उढणारे फक्त काळे कावळेच असतात*
*रणांगणात लढणारी फक्त वीज क्षेञ बचाव संयुक्त कृती समिती*