December 1, 2023
yugarambh
Breaking News
राज्य

समाजामध्ये महिलांविषयी सकारात्मक बदल घडत आहेत : शितल देवी मोहिते-पाटील

अकलूज (युगारंभ ):- नवीन पिढीच्या महिलांमध्ये आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे आजची महिला ही सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. त्यामुळे समाजामध्ये महिलांविषयी आदरभाव वाढला आहे .पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात आज महिलांचे मोठ्या मनाने कौतुक करताना दिसत आहे, असे प्रतिपादन शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील सदस्या, सोलापूर जिल्हा परिषद यांनी ताहेरा फाउंडेशनच्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व गरजूंना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात तस्लिम आतार हिने कुरानच्या पवित्र आयत पठणाने केली. फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकर तांबोळी यांनी प्रास्ताविक करताना फाउंडेशनने राबवलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली व फाउंडेशनला सहकार्य करणाऱ्या वर्गणीदारांचे आभार मानले. कर्तुत्ववान महिला मध्ये राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, घरगुती कुटीर उद्योग करणाऱ्या महिला यांचा सन्मान शितल देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

       कर्तुत्ववान महिला मध्ये फातिमा पाटावाला,अनिसा तांबोळी, आलीमा- बाजी,सायरा आतार, बतुल तांबोळी फातिमा मुलाणी, परविन तांबोळी, साजिदा आतार, डॉ. तमिम देशमुख ,दिपाली माने, नियाजबी तांबोळी, रेश्मा तांबोळी, तमन्ना इनामदार ,लतीफा पठाण, शेहनाज बागवान, मारिया बागवान व रेहाना बागवान यांचा समावेश होता.

महिला दिनाचे औचित्य साधून अरिफा खान ,जुलेखा बागवान, राबिया तांबोळी यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सत्कार मूर्ती मधून महाराष्ट्र राज्य महिला बचत गटाच्या उपाध्यक्ष सायरा आतार यांनी मनोगतात ताहेरा फाउंडेशन चे उत्तम कार्याबद्दल आभिनंदन केले तर माजी पंचायत समिती सदस्या फातिमा पाटावाला यांनी आणखी चांगले काम करण्याचे आश्वासन दिले.   

          कार्यक्रमास हाजी बशीर भाई तांबोळी, दादाभाई तांबोळी, अर्चना पंधे, अस्लम तांबोळी, जाकीर तांबोळी, शाहिद तांबोळी,शादाब तांबोळी तसेच बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शकील शेख यांनी केले तर आभार इलाही बागवान यांनी मानले.

Related posts

अकलूज येथे भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा -“रत्नाई चषक २०२३”

yugarambh

अकलूज येथे ह्रदयरोग व मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

yugarambh

परीवर्तन याेजनेतून पारधी समाजाचा चेहरा माेहरा बदलणार – डाँ बस्वराज शिवपूजे

yugarambh

मंत्री  सावंत यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार गणेश जाधव यांचे मेल द्वारे निवेदन.

yugarambh

किती महागले गहू, तांदूळ? गेल्या पाच वर्षातील दरवाढीची केंद्राने दिली माहिती

Admin

शासकीय निवासी शाळेतील शिक्षक राहुल कुकडे राज्य पात्रता परीक्षेत उत्तीर्ण

yugarambh

Leave a Comment