अकलूज (युगारंभ )-अकलूज पाेलीस ठाणे कडून आज विशेष कामगिरी म्हणून श्रेयस पाटाेळे व राेहन पाटाेळे या लहान मूलांचा हार घालून सत्कार करणेत आला.
अकलूज येथील तळ्यावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या आई व दहा वर्षाचा मुलगा दोघेही पाय घसरुन तळ्यात पडले.पाण्यात दोन्ही माय-लेकराची जिवाच्या आकांताने सुरु असलेली आरडा-ओरड ऐकुन तिथे असलेल्या इ.सातवीत शिक्षण घेणार्या तीन बालकांनी आपल्या जिवाची बाजी लावुन धाडसाने माय-लेकरांचा जीव वाचविला.
याबाबत प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले कि, शंकरनगर (किर्तीनगर) येथील ज्योती विजय शेळके या धुणे धुण्यासाठी तळ्यावर गेल्या होत्या.त्यांच्या सोबत त्यांचा दहा वर्षा मुलगा सोमनाथ हा ही आई सोबत तळ्यावर गेला होता. त्यावेळी सोमनाथचा अचानक पाय घसरुन तो पाण्यात पडला.आपला मुलगा पाण्यत पडल्याचे पाहुन मातेच्या जिवाची घालमेल सुरु झाली. त्या वाचविण्याच्या गडबडीत त्या मातेचाही पाय घसरला .दोघेही माय-लेकरे पाण्यात बुडु लागले.पाणी नाका-तोंडात जावु लागले. जीवाच्या आकांताने माय-लेकराची सुरु असलेली आरडा ओरड तळ्यात म्हैस धुण्यासाठी गेलेल्या व यशवंतनगर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा यशवंतनगर येथे इयत्ता ७वी.मधील विद्यार्थी श्रेयस श्रीकृष्णपाटोळे ,रोहन हनुमंत पाटोळे व इ ५ वीत शिकणारा अभिजीत हनुमंत पाटोळे या बालकांच्या लक्षात आली.धावतच तिनही बालके माय-लेकरांच्या जवळ आले.दोघांची जीव वाचविण्यासाठी सुरु असलेली धडपड त्या बालकांच्या लक्षात आली .क्षणाचाही वालःब न लावता सर्वात मोठ्या असलेल्या रोहन ने मागचा पुढचा विचार न करता आपल्या जीवाची बाजी लावुन पाण्यात उडी घेतली.त्याने बुडणार्या सोमनाथचा हात धरून त्याला पाण्यातून बाहेर ओढले. त्यावे तिथे उपस्थित असलेल्या दोघांनीही रोहनला साथ देत तिघांनी मिळून सोमनाथला वाचवले.
सोमनाथला बाहेर काढेपर्यंत त्याची आई ज्योती या खूप खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. रोहनने पुन्हा एकदा जीव पणाला लावत पाण्यात झेप घेतली. त्यांना हाताला धरून ओढत- ओढत सुखरुप काठावर आणले आणि माय-लेकरांना मरणाच्या दाढेतुन खेचुन बाहेर काढले.
या तीन मुलांच्या प्रसंगावधान व धाडसामुळेच एका आईचे व मुलाचे प्राण वाचले.अतिशय लहान वयाततील बालकांचे धाडस आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे दोन जीवा वाचल्याने सर्व स्तरातून या तीनही मुलांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांचे भावी आयुष्य उज्वल होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेनेही शौर्य गाजवलेल्या मुलांचे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले हाेते परंतू धाडसाचे काैतूक पाेलीसांनी केलेले वेगळेच असते मग अकलूज पाेलीस मागे कसे राहतील तात्काळ धाडसी मूलांना व त्यांचे पालक व शिक्षक यांना बाेलावून सत्कार करून भविष्यात असेच चांगले काम करा अशी सूचनाही पाेनि अरूण सूगावकर यांनी यावेळी केली
अकलूजचे सामाजीक कार्याचे विविध व अनेक पैलू आहेत त्याची चाहूल नेहमी दिसत असते आज या बालकांच्या धाडसाने दिसली आहे.