सचिन करडे / खुडूस-माळशिरस तालुक्यातील वृद्ध कलावंतांना वाढीव निधी मिळण्याबाबत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी, सोलापूर चंचल पाटील यांना अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सोलापूर जिल्ह्याचा विचार करता माळशिरस तालुका लोकसंख्येने क्षेत्रफळाने अतिशय मोठा आहे. या माळशिरस तालुक्यामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 4 लाख 85 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. या तालुक्यात 113 महसुली गावे आहेत शिवाय माळशिरस तालुक्यात एक नगरपालिका व तीन नगरपंचायती आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य याच तालुक्यात आहेत. शिवाय माळशिरस विधानसभेचा संपूर्ण मतदारसंघ असून सुद्धा माळशिरस तालुक्यातील चौदा गावे माढा विधानसभा मतदार संघाला जोडलेली आहेत, एवढा मोठा विस्तीर्ण माळशिरस तालुका आहे. तसेच अनेक प्रकारच्या कलावंतांची फार मोठी लोकसंख्या या तालुक्यात आहे.
वृद्ध कलावंतांसाठी सोलापूर जिल्ह्याला आलेला निधी माळशिरस तालुक्याला अत्यंत कमी प्रमाणात मिळत आहे.सध्या आहे तो येणारा निधी माळशिरस तालुक्याचा अपुरा पडत आहे. त्यामुळे वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
या सर्व बाबींचा व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून माळशिरस तालुक्याला वृद्ध कलावंतांसाठी वाढीव जास्त निधी मिळावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील यांना अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नंदकुमार केंगार साहेब, वृद्ध कलावंत समिती सदस्य,सोलापूर बाळासाहेब संभाजी पारसे व सांस्कृतिक विभाग प्रमुख सोलापूर जिल्ह्याचे भीमराव उर्फ (लालासाहेब)राणु गेजगे यांच्या सहीने देण्यात सदर निवेदन देण्यात आले.