अकलुज (युगारंभ ): – पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम मध्ये उत्पादित झालेल्या ११ लाख ९१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांतराव परिचारक, संचालक सुदाम मोरे आणि हणमंत कदम यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी व्हा.चेअरमन कैलास खुळे आणि कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदि उपस्थीत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम 2021-22 हा दि.23/10/2021 रोजी सुरु झाला असून कारखान्याने 158 दिवसात 10,47,037 मे.टन ऊसाचे गाळप करुन 11,91,111 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
त्याच बरोबर कारखान्याचा साखर उताराही 11.40 असून यामध्ये बी हेवी धरुन आणखी साखर उताऱ्यामध्ये वाढ होणार आहे. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक (मालक) यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच कारखान्याचे कामकाज सुरु असून त्याचप्रमाणे पुढेही अखंडीतपणे सुरु राहील अशी ग्वाही दिली. कारखान्याने गळीत हंगाम 2021-22 मध्ये प्रतिदिन सरासरी 7000 मे.टनाने गाळप चालत असून त्यामध्ये सातत्य राखले आहे. त्याचबरोबर साखर कारखान्याचा साखर उताराही चांगला आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, गळीत हंगाम 2021-22 मध्ये 1 एप्रिल 2022 नंतर गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मे.टन रु.100/- प्रमाणे एफ.आर.पी. व्यतीरिक्त आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे एप्रिल 2022 मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास प्रती मे. टन रूपये 2700/- प्रमाणे ऊस दर दिला जाईल. कारखान्याच्या गळीत हंगाम 2021-22 मध्ये कारखाना गाळपामधील आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडुन उच्चांकी गाळप करणार आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकरराव अंबादास मोरे, श्री.वसंतराव देशमुख, श्री. उमेशराव प्रभाकर परिचारक, श्री.दिलीप त्रिबंक चव्हाण, श्री.हरीष भास्करराव गायकवाड, श्री. ज्ञानदेव श्रीरंग ढोबळे, श्री.तानाजी मारूती वाघमोडे, श्री. बाळासो दादा यलमर, श्री. भगवान भिमराव चौगुले, श्री. लक्ष्मण गोरख धनवडे, श्री.भास्कर लक्ष्मण कसगावडे, श्री.भैरू संतु वाघमारे, श्री.गंगाराम गणपती विभुते, श्री.विजय अगंद जाधव, श्री.किसन विठ्ठल सरवदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.राणू पाटील, कारखान्याचे वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, प्रोडाक्शन मॅनेजर एम.आर. कुलकर्णी, केन मॅनेजर एस.सी.कुमठेकर,चिफ अकौंटंट आर.एम.काकडे, डिस्टीलरी मॅनेजर एस.ई.शेख, को.जन मॅनेजर सचिन विभुते, सिव्हील इंजिनिअर एच.एस.नागणे, मटेरियल मॅनेजर एम.जी.देशपांडे, संगणक प्रमुख, तानाजी भोसले, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर,सहा.अधिक्षक बी.एस.बाबर आदि उपस्थित होते.