माळीनगर(युगारंभ )-दि 1 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे या शाळेचा 72 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच किरण आप्पा वाघमोडे,जेष्ठ नागरिक मोहन गायकवाड ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय वाघमोडे,उपाध्यक्ष
शाम आरडे,माजी अध्यक्ष आप्पासाहेब पाटील,सदस्य संतोष शिंगटे,सतीश वाघमारे,बापूराव वाघमोडे,चंद्रकांत भिताडे,सुनील रसाळ,संजय पवार, सोमनाथ वरकड उपस्थित होते.
विद्यार्थांनी फुगे आणि नारळाच्या फांद्या लावून शाळेची छान सजावट केली तर विद्यार्थींनीकडून
पाहुण्यांसाठी मोठा बुके तयार केला, शाळेतील शिक्षिका गायकवाड व सपकळ यांनी सुंदर रांगोळी काढली
पाहुण्यांचे स्वागत सहशिक्षक लवटे यांनी केले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे यांनी शाळेविषयी जून्या आठवणीना उजाळा देत आजपर्यंतच्या गौरवशाली बाबींची माहिती आपल्या प्रास्ताविकात नमूद केली.
त्यानंतर सन.2022-23या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिलीत पदार्पण 19 बालकांचे पाहूण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.
कु.समृदधी शिंदे हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना थंड पाणी पिता यावे यासाठी दोन पाण्याचे जार शाळेस भेट दिले तर संतोष शिंगटे यांनी दररोज थंड पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले
शेवटी सर्व बालचमूंच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांनी जल्लोष करून वाढदिवस साजरा केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक कदम व प्रदीप राजगुरू यांनी केले तर आभार निसार पठाण यांनी मानले.