माळीनगर(युगारंभ )-पुणे येथील उद्योजक कै. पुष्कराज सुरेश केंजळे यांचे स्मरणार्थ व त्यांचे जयंतीनिमित्त पुष्कराज केंजळे मेमोरियल ट्रस्ट माळीनगर/वेरुळी यांचे वतीने आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माळीनगर साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊस येथे गरजू व गरीब ग्रामस्थांना आरोग्य विषयी साहित्याचे मोफत वाटप आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी माळीनगर परिसरातील वयोवृध्द लोकांना वॉकर, स्टिक, कमरेचा बेल्ट, नि कॅप आदि साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी माळीनगर साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे, पूर्णवेळ संचालक सतीश गिरमे,ज्येष्ठ संचालक राहुल गिरमे,मोहन लांडे, विशाल जाधव,निखिल कुदळे,भागधारक सत्यजित राऊत, ग्रामपंचायतचे सरपंच अभिमान जगताप,उपसरपंच नागेश तूपसौंदर्य,पत्रकार मिलिंद गिरमे,धीरज कुदळे,महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा.चेअरमन महादेवराव एकतपुरे,गहिनीनाथ अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन शिरीषभाई फडे,डॉ.असलम शेख डॉ. विजय कोकाटे डॉ. सत्यजित गिरमे आदी विविध संस्थांचे पदाधिकारी,आर जी ग्रुपचे मेंबर्स, त्याच प्रमाणे नातेवाईक ,हितचिंतक ग्रामस्थ बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश कचरे,संग्राम भोसले,निलेश एकतपुरे,बाळासाहेब कणगी,अनिल बनकर,संजय दळवी,महादेव पाटील आदींनी परिश्रम घेतले.