खंडाळी / युगारंभ- ‘बेलोसा’ या लघुपटाने राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला ठसा उमटवला आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे दि. २५ ते ३० मार्च या कालावधीत राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला.
या लघुपटासाठी फ्रेंच अभिनेत्री मरिन बोर्गो यांच्या हस्ते दिग्दर्शक मनोज भांगे यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार स्विकारला.
गेल्या दोन महिन्यांत या लघुपटाला अकरा पुरस्कार प्राप्त झाले असल्याचे सहाय्यक दिग्दर्शक लखन साठे पेरूवाला यांनी सांगितले
या लघुपटाच्या माध्यमातून कातकरी आदिवासी समाजावर प्रकाश टाकण्यात आला असून त्यांचे सामाजिक प्रश्न मांडले आहेत.
आतापर्यंत या लघुपटाने कर्नाटकातील कलबुर्गी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मुंबईतील बायोस्कोप चित्रपट महोत्सव, चेन्नईमधील आर्ट गॅलरी चित्रपट महोत्सव, तसेच कोलकाता, पंजाब, दिल्ली आदी ठिकाणी झालेल्या चित्रपट महोत्सवांत छाप पाडली.
यामध्ये सिनेअभिनेते महेश घाग, सह्याद्री मळेगावकर, दीपाली बडेकर, श्रेया जाधव, अविनाश पॉल, रणजित झेंडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाची निर्मिती संतोषकुमार रूपनवर, मीना रूपनवर व श्रीकांत देशमुख यांनी केली आहे.तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून श्रीकांत देशमुख,रणजित झेंडे,लखन साठे,हेमंत गलांडे,अक्षय सुरवसे यांनी काम पाहिले आहे.