अकलूज (युगारंभ )-अकलूज येथील गावठाण जागेतील प्लॉट धारकांना घरे बांधून देण्यासंदर्भात आज शिवरत्न बंगला येथे सर्व प्लॉट धारकांची बैठक माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या प्रसंगी मा. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहुन घरकुल किंवा म्हाडा या दोन योजनेपैकी एका योजनेतून घरे बांधुन देण्याबाबत प्लाॅटधारकांची मते जाणुन घेतली.
यावेळी शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील व तहसिलदार जगदिश निंबाळकर उपस्थित होते.
सर्वांनी एकमताने म्हाडा योजनेतून घरे बांधुन देण्याबाबत सहमती दर्शवली असून लवकरच याबाबतचा कागदोपत्री पाठपुरावा करून सोसायटीची स्थापना करून कामांची सुरूवात करण्यात येणार आहे.
तेव्हा अकलूज नगरपरिषदे मध्ये पहिल्यांदाच म्हाडा चा गृहनिर्माण प्रकल्प साकारतोय त्याबद्दल सर्वांना औत्सुक्य व कौतुक वाटत असल्याचे बोलले जातेय.