अकलूज(युगारंभ )-अकलूज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पत्रकार डीएस गायकवाड लिखित दोन भीम गीतांचे प्रसारण करण्यात आले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार डी एस गायकवाड यांनी लिखित केलेल्या दोन भीम गीतांचा प्रसारण सोहळा पार पडला. अकलूज मध्यवर्ती चे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते ही गीते प्रसारित करण्यात आली.
डॉ बी आर आंबेडकर व मी कडक निळी नामाटी स्वाभिमानाची अशी ही दोन गीते असून स्वर संगम रेकॉर्डिंग स्टुडिओ टेंभुर्णी यांनी ही गीते स्वरबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे आणि हरीश तरटे यांच्या आवाजातून ही गीते ऐकावयास मिळणार आहेत.
याप्रसंगी बोलताना मोहिते पाटील म्हणाले की अनेक गीतकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आपल्या गीतांच्या माध्यमातून सांगितले.यामुळे समाज प्रबोधनाचे कार्य मोठ्या प्रमाणात झाले आहे.
याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सन्मान डीएस क्रियेशनच्यावतीने करण्यात आला.डीएस क्रिएशन या यूट्यूब चॅनल वरून सदरची गीते प्रस्तुत करण्यात आली असून भविष्यातही सामाजिक प्रबोधन पर अनेक गीते येणार असल्याचे यावेळी निर्माता नितीन गायकवाड व सुप्रसिद्ध ढोलकी पटू अजिंक्य गायकवाड यांनी सांगितले.
या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माळशिरस तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले,तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे,भाजपा सोलापूर शहराध्यक्ष संजय पनासे,भाजपा एससी मोर्चा तालुका सरचिटणीस अजित साठे, रिपाइं वेळापूर युवा आघाडी शहराध्यक्ष स्वप्नील सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी गीतकार डी एस गायकवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.