इंदापूर (युगारंभ )-श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सराटी ता- इंदापूर येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात सुरवात झाली.
कै. सोपान कृष्णा जाधव यांच्या स्मरणार्थ अल्पोपहार,श्री चांगदेव पंढरीनाथ कोकाटे यांचे कडून दुपारचे जेवण आणि कै केरबा अनंतराव कोकाटे पाटील यांच्या स्मरणार्थ सायंकाळच्या प्रसादाचे नियोजन करण्यात आले.
ह.भ.प. चांगदेव महाराज जाधव सर यांची प्रवचन सेवा पार पडली तर रात्रीच्या पहिल्या कीर्तनाचे पुष्प युवा किर्तनकार अभिजित महाराज कुरळे यांनी गुंफले.
किर्तन सेवेसाठी त्यांची तुकाराम महाराजांचा मंगलचरणातील
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी,
तेथे माझे हरी वृत्ती राहो!आणिक न लगे माईक पदार्थ,
तेथे माझे आर्त नको देवा!!
या अभंगाचे विश्लेषण करत
पहिल्याच दिवशी देवाच्या नामाचे वर्णन करून ह्रदयापर्यंत ठाव घेण्याचे काम आपल्या कीर्तनातून केले.
या हरिनाम सप्ताहसाठी श्रीराम गणेश भजनी मंडळ गणेश मंदीर सराटी,श्री हनुमान भजनी मंडळ सराटी , महिला भजनी मंडळ सराटी,उदयनगर भजनी मंडळ यांची साथ लाभली आहे.तसेच शिवप्रेमी तरूण मंडळ,अंबिका गणेश मंडळ,महालक्ष्मी तरूण मंडळ,श्रीमंत छत्रपती गणेश मंडळ सराटी यांचे सहकार्य लाभले आहे.