इंदापूर ( युगारंभ)-श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सराटी ता.इंदापूर येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसर्या दिवशी श्री रामचंद्र उत्तम कोकाटे यांचा अल्पोपहार तसेच संजय शिवाजी कोकाटे यांचे दुपारचे जेवण तर श्री हरी बाबूराव कोकाटे यांचे सायंकाळची यांची भोजन सेवा लाभली.
ह.भ.प. उज्वला शेलार मॅडम यांचे प्रवचन सेवा पार पडली.दुसऱ्या दिवसाची किर्तनरुपी सेवा हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज कोकाटे श्रीक्षेत्र कन्हेरी यांची झाली त्यांनी
सेवेला घेतलेला अभंग …
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवीती, काय द्यावे यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हितोपदेश करुनी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मजा येती सांभाळीती
या अभंगातून तुकाराम महाराजांनी संतांविषयी जी कृतज्ञता व्यक्त केली आहे.ती यावेळी कोकाटे महाराज यांनी मांडली. सदर अभंग संत प्रकरणातील असून संतांचे उपकार जगावरती कशाप्रकारे आहेत हे महाराजांनी या अभंगातून विस्तृत स्वरूपात सांगितले
यावेळी मृदूंगमणी ह.भ.प.तुकाराम साठे, व्यासपीठ चालक ह.भ.प.शत्रुघ्न महाराज जगदाळे, ह.भ.प. अजित महाराज कुरळे, युवाकिर्तनकार अभिजित महाराज कुरळे संयोजक ऋषीकेश कुरळे यांनी बहुमोल साथ दिली.